शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Valmiki Temple In Pakistan: खुशखबर! पाकिस्तानमधील १२०० वर्ष जुने वाल्मिकी मंदिर पुनश्च हिंदूंच्या ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 12:15 IST

Valmiki Temple In Pakistan: वाल्मिकी मंदिराचा पुनश्च ताबा हे पाकिस्तानस्थित हिंदूंनी दीर्घकाळ दिलेल्या कायदेशीर लढाईचे यश आहे.

पाकिस्तानातील प्राचीन मंदिर: भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी अनेक प्राचीन मंदिरे पाकिस्तानच्या भागात गेली होती. सद्यस्थितीत ती भग्नावस्थेत आहेत. या मंदिरांपैकी एक वाल्मिकी मंदिर आहे, जे सध्या लाहोरमध्ये आहे.

लाहोरमधील वाल्मिकी मंदिर : पाकिस्तानमध्ये आजही अनेक प्राचीन मंदिरे आहेत, जी देखभालीअभावी भग्नावस्थेत आहेत. मात्र ही मंदिरे आजही हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. असेच एक मंदिर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आहे, जे १२०० वर्षे जुने आहे. पाकिस्तान सरकारने या वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा केली आहे. त्यावर काही लोकांनी बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे समजते. चला जाणून घेऊया या मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी.

१२०० वर्षे जुन्या वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार 

नुकतेच, पाकिस्तान सरकारने लाहोर, पाकिस्तान येथे असलेल्या वाल्मिकी मंदिराच्या नूतनीकरणाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून या मंदिरावर काही लोकांनी अवैध कब्जा केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी एका हिंदू संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. या मंदिरात पूर्वी केवळ वाल्मिकी समाजातील लोकच दर्शन आणि पूजेसाठी जाऊ शकत होते.

ईटीपीबीचे प्रवक्ते अमीर हाश्मी यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत 'मास्टर प्लॅन' अंतर्गत वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल. ते म्हणाले, "१०० हून अधिक हिंदू, काही शीख आणि ख्रिश्चन नेते वाल्मिकी मंदिरात जमले. हिंदूंनी त्यांचे धार्मिक विधी पार पाडले आणि प्रथमच लंगर (प्रसाद) आयोजित करण्यात आला."

हे शहर भगवान श्री राम यांचे पुत्र लव याने वसवले होते.

पौराणिक मान्यतेनुसार, पाकिस्तानमध्ये स्थित लाहोर शहराची स्थापना भगवान श्री राम यांचे पुत्र लव यांनी केली होती. याला जुन्या पंजाबची राजधानी म्हणत. त्याच वेळी ते लवपूर म्हणूनही ओळखले जात असे.

लाहोरच्या दोनच मंदिरात पूजा केली जाते

लाहोरमध्ये असलेल्या वाल्मिकीच्या मंदिराच्या इतिहासाबद्दल फारसे माहिती नाही. पण हो स्थानिकांच्या माहितीनुसार हे मंदिर १२०० वर्षे जुने आहे. फाळणीपूर्वी येथे शीख आणि हिंदू लोक मोठ्या संख्येने राहत होते आणि त्यावेळी ते श्रद्धास्थान मानले जात होते. लाहोरमध्ये श्री कृष्णा च्या मंदिराव्यतिरिक्त फक्त वाल्मिकी मंदिर आहे, जिथे पूजा केली जाते. आणि आता जीर्णोद्धाराच्या निमित्ताने वाल्मिकी मंदिरातही नित्य पूजा सुरू होईल. 

टॅग्स :Templeमंदिर