शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Valentines Day 2025: कोणी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर;संदीप माहेश्वरी सांगताहेत सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:05 IST

Valentines Day 2025:आज जागतिक प्रेम दिवस अर्थात व्हालेंटाईन्स डे; आजच्या दिवशीही तुम्ही सिंगल असाल तर नाराज होऊ नका, हे वाचा!

आज जागतिक प्रेम दिवस अर्थात व्हालेंटाईन्स डे (Valentines Day 2025)! आजच्या दिवशी इतरांचे कपल फोटो पाहून आपण सिंगल आहोत या विचाराने नाराज होऊ नका. आपली लव्ह लाईफ चांगली व्हावी असे वाटत असेल, तर प्रसिद्ध वक्ते संदीप महेश्वरी एका गोष्टीतून आपल्याला सांगतात, `आधी स्वत:वर प्रेम करायला शिका. जोवर तुमची ओंजळ प्रेमाने भरलेली नसेल, तोवर तुम्ही दुसऱ्याच्या पदरात प्रेमाचे दान टाकू शकत नाही.' 

एकदा एक मुलगा आपल्या बाबांकडे हट्ट करतो, मी सुद्धा तुमच्याबरोबर कामाला येणार. वडील म्हणाले, मी जातो ती वाट फार कठीण आहे. एक उंच डोंगर पार करून कामावर जावे लागते. एवढे समजवूनही मुलाने येण्याचा हट्ट सोडला नाही. वडील त्याला घेऊन निघाले. डोंगर चढता चढता मुलाला धाप लागत होती. पण सभोवतालचा परिसर पाहून मजाही वाटत होती. वर वर जाताना दमछाक होऊ लागली. अशातच तो अनावधानाने एका मोठ्या दगडावर आदळला. त्याच्या तोंडून आर्त हाक आली....आह..!

त्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटला, तसा मुलाने सभोवताली पाहिले. वडील पुष्कळ वर होते. मग आपली नकल कोणी केली? या विचारात तो ओरडला, कोण आहेस तू? पुन्हा तसाच आवाज. वडिलांनी मागे वळून पाहिले. मुलासाठी हा अनुभव नवीन असल्याने त्यांनी मागे येऊन मुलाला सावरले आणि त्याची गंमत करण्यासाठी मोठ्याने म्हणाले, `माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे....'

मुलगा वडिलांना बिलगला, त्याचवेळेस त्याचे कुतुहलही वाढले. वडिलांनी पुन्हा म्हटले, तू खूप गोड मुलगा आहेस. निसर्गाकडून असे कौतुकाचे बोल ऐकून मुलगा सुखावला आणि वडिलांना म्हणाला, हे नक्की काय होतंय?

त्यावर वडील म्हणाले, `बेटा तू छान आहेस, हे तुला पटलेले असेल तर जगाकडूनही तुझी वाहवा होईल, पण तू स्वत:ला वाईट ठरवलेस तर लोकही तुझी चेष्ठाच करतील. ही मोठी शिकवण या निसर्गाकडून मिळते. आपला ध्वनी हाच प्रतिध्वनी स्वरूपात ऐकू येत असतो. म्हणून आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाऊन म्हण, `मी खूप खुष आहे, समाधानी आहे, माझं सर्वांवर प्रेम आहे.' मग बघ जग तुला काय सांगेल!'

मित्रांनो आपण सर्वात आधी आपली मानसिकता बदलली पाहिजे. सुधारणा स्वत: मध्ये केल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपली हाक ऐकली पाहिजे, स्वत:वर प्रेम केले पाहिजे. जेणेकरून जगाने आपली साथ सोडली, तरी तुम्हाला एकटेपणा जाणवता कामा नये. म्हणून प्रेम करण्याची सुरुवात स्वत:पासून करा. आपोआपच तुम्ही जगावर प्रेम करू लागाल. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी