शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

संकष्ट चतुर्थी 2025 व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 23:02 IST

Vaishakh Sankashti Chaturthi May 2025: वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय कधी आहे? सोप्या पद्धतीने व्रत पूजन कसे करावे? जाणून घ्या...

Vaishakh Sankashti Chaturthi May 2025 Vrat Puja Vidhi: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, दुसरा वैशाख महिना सुरू आहे. मराठी नववर्षातील दुसरी संकष्ट चतुर्थी साजरी होत आहे. काही मान्यतांनुसार, वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या व्रतात गणपतीच्या एकदंत स्वरुपाचे पूजन केले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मे महिन्यातील वैशाख संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ, व्रतपूजनाचा सोपा विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया...

वैशाख संकष्ट चतुर्थीला वरिष्ठ आणि मालव्य राजयोग यांसारखे काही अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. 

वैशाख संकष्ट चतुर्थी: शुक्रवार, १६ मे २०२५

वैशाख संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ०३ मिनिटे.

वैशाख संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, १७ मे २०२५ रोजी पहाटे ०५ वाजून १३ मिनिटे.

संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते.

वैशाख संकष्ट चतुर्थी व्रत पूजन कसे करावे?

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते.  रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून २९ मिनिटे
ठाणेरात्रौ १० वाजून २८ मिनिटे
पुणेरात्रौ १० वाजून २३ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ १० वाजून २२ मिनिटे
कोल्हापूररात्रौ १० वाजून १७ मिनिटे
सातारारात्रौ १० वाजून २१ मिनिटे
नाशिकरात्रौ १० वाजून २७ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ १० वाजून २१ मिनिटे
धुळेरात्रौ १० वाजून २५ मिनिटे
जळगावरात्रौ १० वाजून २२ मिनिटे
वर्धारात्रौ १० वाजून ०९ मिनिटे
यवतमाळरात्रौ १० वाजून १० मिनिटे
बीडरात्रौ १० वाजून १६ मिनिटे
सांगलीरात्रौ १० वाजून १६ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ १० वाजून १७ मिनिटे
सोलापूररात्रौ १० वाजून १३ मिनिटे
नागपूररात्रौ १० वाजून ०८ मिनिटे
अमरावतीरात्रौ १० वाजून १३ मिनिटे
अकोलारात्रौ १० वाजून १६ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ १० वाजून २१ मिनिटे
भुसावळरात्रौ १० वाजता २२ मिनिटे
परभणीरात्रौ १० वाजून १३ मिनिटे
नांदेडरात्रौ १० वाजून १० मिनिटे
धाराशीवरात्रौ १० वाजून १३ मिनिटे
भंडारारात्रौ १० वाजून ०६ मिनिटे
चंद्रपूररात्रौ १० वाजून ०४ मिनिटे
बुलढाणारात्रौ १० वाजून १९ मिनिटे
मालवणरात्रौ १० वाजून १९ मिनिटे
पणजीरात्रौ १० वाजून १६ मिनिटे
बेळगावरात्रौ १० वाजून १४ मिनिटे
इंदौररात्रौ १० वाजून २६ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ १० वाजून २६ मिनिटे

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीganpatiगणपती 2024Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सण