शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Vaishakh Purnima 2022 : वैशाख पौर्णिमेला पिंपळाची पूजा केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:26 IST

Vaishakh Purnima 2022: या दिवशी शक्य झाल्यास गंगा स्नान करावे. तसे केल्याने कुंभ मेळ्यात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे म्हणतात. 

सोमवार, १६ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या पूजेचे महत्त्व असते, कारण या तिथीला पिंपळ पौर्णिमा असेही शास्त्राने नाव दिले आहे. हिंदू धर्मात पिंपळ वृक्षाचे किती महत्त्व आहे ते वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे या दिवशी पिंपळाची पूजा केली असता कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया. 

१. या दिवशी पिंपळाची पूजा केल्यास ग्रह आणि पितृ दोष दूर होण्यास मदत होते.

२. पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी लग्नकार्य वगळता सर्व प्रकारचे शुभ कार्य करता येते. यासाठी गुरु किंवा सूर्य बळ पाहण्याची गरज नाही.

३.  या दिवशी पिंपळाची विधिवत पूजा केल्यामुळे शनि, गुरु यांच्यासह सर्व ग्रह शुभ फल देण्यास सुरवात करतात.

४. या दिवशी पिंपळाचे रोप लावल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात आणि देवगुरू बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

५. शास्त्रानुसार पिंपळ हा माता लक्ष्मीचा प्रिय वृक्ष आहे. वैशाख पौर्णिमेला ती या वृक्षावर येऊन वास करते. म्हणून जो कोणी या दिवशी पिंपळाची पूजा करतो त्याच्या घरात संपत्ती व समृद्धी येते. 

६. या दिवशी, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याला विशेष महत्त्व महत्व आहे.अश्वाथोपायन उपोषणाच्या संदर्भात महर्षि शौनक सांगतात, की शुभ मुहूर्तामध्ये दररोज तीनदा पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास दारिद्रय, दु: ख आणि दुर्दैव दूर होते. यासाठीच लोक पिंपळाची पूजा करतात आणि दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळवतात. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने विवाह लवकर ठरतो, अशीही अनेकांना प्रचिती आली आहे. 

या ग्रहस्थितीचा उचित परिणाम साधण्यासाठी पिंपळाच्या सान्निध्यात जाण्याची संधी दवडू नका. या दिवशी शक्य झाल्यास गंगा स्नान करावे. तसे केल्याने कुंभ मेळ्यात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे म्हणतात.