शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्नतेचे शीतल शिंपण करणारा वैशाख मास धार्मिकदृष्ट्याही तेवढाच महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:43 IST

हिंदु पंचांगानुसार चांद्रवर्षाचा हा दुसरा महिना. 'धर्मबोध' या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी वैशाखाचे सुंदर वर्णन केले आहे. या ...

ठळक मुद्देशिखांचे गुरु गोविंदसिंग यांनी वैशाख शुक्ल प्रतिपदेला `खालसा' ची स्थापना केली.वैशाख शुक्ल सप्तीला गंगा जन्हुच्या कानातून बाहेर पडली म्हणून हा दिवस 'गंगासप्तमी' नावाने ओळखला जातो. बंगालमध्ये वैशाख शुक्ल नवमीला 'सीता नवमी' म्हणतात.वैशाख पौर्णिमेला 'बुद्धजयंती' असते.

हिंदु पंचांगानुसार चांद्रवर्षाचा हा दुसरा महिना. 'धर्मबोध' या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी वैशाखाचे सुंदर वर्णन केले आहे. या महिन्याची पौर्णिमा विशाखा नक्षत्राने युक्त असते अथवा विशाखा नक्षत्र पौर्णिमेच्या आधी वा नंतर असते, म्हणून या महिन्याला `वैशाख' असे म्हणतात. या मासातही उत्तरायण असते. या मासाचे प्राचीन काळातील प्रचलित नाव `माधव' असे आहे. ज्ञानदेवांनी ज्ञोश्वरीत या `माधव' चा उल्लेख `माधवी' असा केला आहे. 

'ना तरि उद्यानी माधवी घडे। ते वनशोभेची खाणि उघडे।'

अर्थात जसा वसंतऋतूच्या आगमनाने उपवनात सर्व वृक्षवल्लींना बहर येतो, वनश्रीचे भांडार उघडते, चैत्राप्रमाणेच हा महिनादेखील वसंतऋतूचा मास म्हणून ओळखला जातो. प्रसन्नतेचे शितल शिंपण करणारा हा ऋतू! अण्णासाहेब किर्लोस्करांच्या `सौभद्र या सदाबहार नाटकातील-

वैशाखमासि वासंतिक समय शोभला,आम्रासव पिउनि गान करिती कोकिला।

या गीतातून या प्रसन्नतेचे यथार्थ वर्णन आले आहे. निसर्गातील प्रसन्नता मनाला प्रसन्न करते. ही प्रसन्नता अधिकाअधिक वृद्धित करण्याचे महन्मंगलकार्य धर्म करत असतो. याचे सुंदर उदाहरण म्हणून वैशाख मासातील धर्मकृत्यांकडे पाहता येईल. यावेळी उन्हाळ्याची प्रखरता जाणवू लागलेली असते. अशावेळी पाण्याशी संबंधित अशी व्रतवैकल्ये या महिन्यात येजलेली दिसतात.

प्रात:स्नानासाठी प्रशस्त मानल्या गेलेल्या महिन्यांमध्ये हा महिना येता़े . गाईची नित्यपूजाही या महिन्यात केली जाते. वैशाख हा जेव्हा अधिक महिना असतो, त्यावेळी या अधिक महिन्यात काम्यकर्म समाप्तीचा निषेध सांगितलेला आहे. म्हणजे कुठल्याही काम्यव्रताची सांगता या अधिकमासात करू नये. मात्र अधिक वैशाखमास आणि निज वैशाखमास या दोन्हीमध्ये प्रात:स्नान करण्याची प्रथा आहे.

शिखांचे गुरु गोविंदसिंग यांनी वैशाख शुक्ल प्रतिपदेला `खालसा' ची स्थापना केली. त्यामुळे या दिवशी पंजाब राज्यामध्ये `वैशाखी' चा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

वैशाख शुक्ल सप्तीला गंगा जन्हुच्या कानातून बाहेर पडली म्हणून हा दिवस 'गंगासप्तमी' नावाने ओळखला जातो. बंगालमध्ये वैशाख शुक्ल नवमीला 'सीता नवमी' म्हणतात. कारण जनकाला भूमी नांगरताना या दिवशी सीता सापडली, असे मानले जाते. त्याची आठवण म्हणून या दिवशी शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीचा तर सीतामाईचा वैशाख शुक्ल नवमीचा. स्त्री-पुरुष समानता आपल्या पूर्वजांनाही मान्य होती, त्याचेच हे सुंदर उदाहरण! आद्यशंकराचार्यांच्या जयंतीमुळे वैशाखाची दशमी तिथी परमपवित्र ठरली आहे. तर वैशाख पौर्णिमेला `बुद्धजयंती' असते. वैशाख पौर्णिमेला वेद प्रकटे अशी आपली श्रद्धा आहे म्हणून या दिवशी अनेक मंडळी वेदांची पूजा करतात. बंगाली स्त्रिया वैशाख मासात अश्वत्थवृक्षाची पूजा करतात. सुख शांतीसाठी केल्या जाणाNया या व्रताला `अश्वत्थपट व्रत' म्हणतात.