शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Tulsi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:44 IST

Tulsi Vivah Mangalashtak in Marathi: चातुर्मास संपताच तुलसी विवाह संपन्न होतो, यंदा २-५ नोव्हेंबर हा सोहळा रंगणार आहे, त्यात ही मंगलाष्टकं हवीच!

कार्तिक शुद्ध एकादशी (प्रबोधिनी एकादशी) पासून पौर्णिमेपर्यंतच्या काळात भगवान विष्णूंचे शाळीग्राम स्वरूप आणि तुळशी माता यांचा विवाह लावला जातो. यंदा २-५ नोव्हेंबर दरम्यान हा तुलसी विवाह (Tulasi Vivah 2025) सोहळा रंगणार आहे. हिंदू विवाह परंपरेनुसार, तुळशीच्या लग्नातही 'मंगलाष्टके' म्हणणे अनिवार्य मानले जाते, कारण मंगलाष्टके म्हणजे नवदाम्पत्याला अक्षय आशीर्वाद आणि शुभ कामना देणारे मंगलाष्टक (Tulasi Vivah Mangalashtak) एकसुरात म्हणा. 

Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

तुळशी विवाहामध्ये, ही मंगलाष्टके तुळशी (वधू) आणि शाळीग्राम (वर) यांना उद्देशून म्हटली जातात, ज्यामुळे या विधीला एक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते. हा केवळ एक धार्मिक विधी नसून, यातून कन्यादान करण्याचे पुण्य लाभते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. मंगलाष्टके म्हणताना संपूर्ण वातावरण मंगलमय होते आणि विवाहाचे पावित्र्य वाढते. ज्यांच्या घरी कन्या नाही, त्यांना तुळशी विवाह करून कन्यादानाचे पुण्य मिळते, आणि या मंगलाष्टकांच्या उच्चारणामुळे त्यांना ते पुण्य अनुभवता येते.

तुळशी विवाहासाठी पारंपारिक लग्नसोहळ्यातील मंगलाष्टकांप्रमाणेच श्लोक वापरले जातात, ज्यात तुळशी मातेचा विशेष उल्लेख असतो. 

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना

तुलसी विवाह मंगलाष्टक (Tulsi Vivah Mangalashtak)

१. पहिले मंगलाष्टक (गणेशाचे आवाहन)श्लोक: स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदं । बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणीम् रांजणं । लेण्याद्री गिरिजात्मजं गणपतीं श्री क्षेत्र ओझरम् । देऊनि पदी वंदनं वधुवरां कुर्वन्तु ते मंगलम् ॥ १ ॥ शुभ मंगल सावधान!

२. दुसरे मंगलाष्टक (कमल आणि लक्ष्मीचे स्मरण)श्लोक: लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरान् धनवंतरी चाम्बुधे । देऊनि वधूवरांस परिसां, रत्ने चतुर्दश ॥ जे देवें असुरें, हरीं तुळसीचा विवाह केला । तो विवाहोत्सव सौख्य भाग्य सुख-शांती दे, मंगलम् ॥ २ ॥ शुभ मंगल सावधान!

३. तिसरे मंगलाष्टक (जनकादि राजांचे आशीर्वाद)श्लोक: मान्धाता भरतो नृपश्च सगरो, धन्यो दिलीपोनलः । पुण्यो धर्मसुतो ययातिनहुषौ, कुर्वन्तु वो मंगलम् ॥ औदार्ये तरुणे तिघे जनहिती सद्बुद्धी दे निश्चल । गृहस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा, देवो सदा मंगलम् ॥ ३ ॥ शुभ मंगल सावधान!

४. चौथे मंगलाष्टक (देवी देवतांचे आशीर्वाद)श्लोक: गौरी श्री कुलदेवता च सुभगा, कद्रूसुपर्णाशिवाः । सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती ॥ स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी । वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुर्वन्तु वो मंगलम् ॥ ४ ॥ शुभ मंगल सावधान!

५. पाचवे मंगलाष्टक (प्रगतीची कामना)श्लोक: लाभो संतती संपदा बहु तुम्हा, लाभोतही सद्गुण । साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ॥ सारे राष्ट्रधुरीण हेचि कथिती, किर्ती करा उज्ज्वल । गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवरां, देवो सदा मंगलम् ॥ ५ ॥ शुभ मंगल सावधान!

६. सहावे मंगलाष्टक (पवित्र नद्यांना आवाहन)श्लोक: गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। ६।। शुभ मंगल सावधान!

७. सातवे मंगलाष्टक (लक्ष्मी आणि विष्णूला आवाहन)लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ७ ।। शुभ मंगल सावधान!

८. आठवे मंगलाष्टक (शुभ घडीचे आवाहन)श्लोक: आली लग्न घडी समीप, श्री हरी घेऊनि यावा घरा । गृह्योत्के मधुपर्क पूजन करा, अन्तःपटाते धरा ॥ दृष्टादृष्ट वधू-वरा न करिता, दोघे करावी उभी । वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपती मंगलम् ॥ ६ ॥ शुभ मंगल सावधान!

या आठव्या मंगलाष्टकाच्या समाप्तीनंतर अंतरपाट काढला जातो आणि वधु-वर (तुळशी आणि शाळीग्राम) एकमेकांना पाहतात आणि सनई, चौघडे वाजून विवाह पूर्ती होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tulsi Vivah Mangalashtak: Recite these prayers for blessings and merit.

Web Summary : Tulsi Vivah, symbolizing Vishnu and Tulsi's marriage, occurs in November. Reciting Mangalashtak bestows blessings, akin to giving away a daughter in marriage. The verses create a sacred atmosphere, granting merit to those without daughters.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण