शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:03 IST

Tulsi Vivah 2025: कार्तिकी एकादशी पाठोपाठ तुलसी विवाहाची लगबग सुरु होते, पण या गडबडीत तुळस कोणती निवडावी ते जाणून घ्या. 

यंदा तुलसी विवाहाला मिळणार आहेत फक्त ४ दिवस, पैकी कार्तिकी एकादशी झाली. आता ५ नोव्हेंबर आधी तुलसी विवाह करणार असाल तर विवाहाच्या तयारी बरोबरच तुळशीतील मुख्य भेद देखील जाणून घ्या. 

Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2025) झाली आणि दुसर्‍या दिवशी पासून अर्थात ३ नोव्हेंबर पासून ५ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत (Tripuri Purnima 2025) तुळशीचा विवाह (Tulsi Vivah 2025)सोहळा रंगणार आहे. हिंदू घरामध्ये तुळस असतेच, पण काही घरांमध्ये इच्छा असूनही तुळशीचे रोप टिकत नाही आणि दर वेळी नवीन तुळस आणण्याची वेळ येते. कारण घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते. शास्त्रात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले गेले आहे. तुळशीचेही अनेक प्रकार आहेत. पैकी रामा आणि श्यामा तुळशी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. मात्र वास्तूसाठी आणि तुलसी विवाहासाठी कोणती तुळशी योग्य, त्यातला फरक कसा ओळखायचा, त्यामुळे होणारे लाभ कोणते ते तुळशी विवाहाच्या निमित्ताने जाणून घेऊ. 

हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र मानले जाते. असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता नसते. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण, ती कोणत्या प्रकारची तुळस लावावी ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रामा तुळशी, श्यामा तुळशी, वन तुळशी ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरी तुळशी असेही म्हणतात. बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा तुळशी दिसतात. त्यातला फरक समजून घेऊ. 

Tulsi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

घरामध्ये कोणती तुळशी लावावी, रामा की श्यामा?

ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळशी लावू शकता. तुळशीची लागवड करून तुम्ही राम किंवा श्यामा यांची पूजा करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकता. पण, पूजेच्या दृष्टिकोनातून रामा तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते. 

तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे?

तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ असते असे मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते.

रामा आणि श्यामा तुळशीतला मुख्य फरक

श्यामा तुळशीचा रंग किंचित जांभळा आहे. त्याची पाने काळ्या रंगाची असतात. श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळे पूजेपेक्षा आयुर्वेदात त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. याउलट रामा तुळस ही हिरवीगार असते. ती देखील औषधी असते, पण तिचा वापर पूजेत जास्त केला जातो. त्यामुळे विवाहासाठी रामा तुळस आणणे जास्त योग्य ठरते, पण तुमच्या कडे श्यामा तुळस असेल तर ती देखील विवाहासाठी शास्त्र मान्य समजली जाते. 

Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना

तुळशीचे चमत्कारिक उपाय

तुळशीची पाने सुकल्यावर फेकून देऊ नका, त्याऐवजी ती लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवा आणि तिची छोटीशी पुरचुंडी बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवा. यात रामा तसेच  श्यामा तुळशीची पाने चालू शकतात. हा उपाय केला असता लक्ष्मी कृपा प्राप्त होते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. 

वैवाहिक अडचणीवर उपाय 

जर कोणाच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुळशीमंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. तसेच विवाह लवकर ठरतो. 

आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी 

शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशीमंजीरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते तसेच आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्ग सापडतो.

व्यावसायीक अडचणींवर मात 

व्यवसायात प्रगती आणि प्रगती साधायची असेल तर ११  तुळशीच्या पानांवर 'श्री' लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. नोकरीचा मार्ग सुकर होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rama or Shyama Tulsi for Tulsi Vivah 2025: Key Differences

Web Summary : Tulsi Vivah celebrations are from November 3rd to 5th. Rama Tulsi is preferred for marriage due to its auspiciousness and use in rituals, though Shyama Tulsi is also acceptable. Discover the differences and benefits of each for prosperity and remedies.
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण