शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 12:23 IST

Tulasi Vivah 2024: कार्तिक द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाह केला जातो, पण ही प्रथा कशी सुरू झाली आणि ती कशी साजरी करायची ते जाणून घ्या.

श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात. यंदा १३ ते १५ नोव्हेंबर तुळशी विवाह (Tulasi Vivah 2024) सोहळा रंगणार आहे, त्यानिमित्त सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

तुळशी विवाहाची आख्यायिका : (Story Behind Tulasi Vivah Ritual)जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना कळून चुकले. म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. 

तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व : (Reason Behind Tulasi Vivah)तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.  

तुळशीची आरती : (Tulasi Vivah Aarti)

जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी। ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।

तुळशी विवाहाची पद्धत : (Tulasi Vivah Vidhi)

कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व वरील दिवशी तिचे लग्न लावतात. यंदा १३-१५ नोव्हेंबर या कालावधीत गोरज मुहूर्तावर अर्थात सूर्यास्ताच्या वेळी तुळशी विवाह करायचा आहे. 

विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. एकादशीला अनेकांचा उपवास असल्याने द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची प्रथा रूढ झाली आहे. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४