शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

Tulasi Plant: उन्हाळ्यात तुळशीची वाढ खुंटू नये, त्यासाठी घरगुती उपयुक्त टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:15 IST

Vijaya Ekadashi 2025: २४ फेब्रुवारी रोजी विजया एकादशी आहे आणि एकादशीला कृष्ण प्रिय तुळशीला अधिक महत्व असते, तिच्या वाढीसाठी टिप्स जाणून घेऊ.

हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. उन्हाळ्यात तुळशीच्या नाजुक रोपाची विशेष काळजी घ्यावी लागते, तसेच काही नियमही पाळावे लागतात, त्याबद्दल जाणून घेऊ. 

परंतु तुळशीचे काही नियम आहेत. त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद तुम्हाला कायम लाभेल. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका अन्यथा आर्थिक अडचणी, आरोग्याची हेळसांड, प्रगतीत अडथळे इ गोष्टी भेडसावू शकतात! २४ फेब्रुवारी रोजी विजया एकादशी (Vijaya Ekadashi 2025) आहे आणि एकादशीला कृष्ण प्रिय तुळशीला अधिक महत्व असते. तिची जपणूक करण्यासाठी एकादशीनिमित्त पुढील टिप्स जाणून घेऊ. 

>> तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका. येत्या सोमवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत. त्यामुळे दोन दिवसात तुळशीचे रोप मान टाकणार नाही, अशा बेताने ठिबक सिंचन सदृश सोय करून ठेवावी. 

>> या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. 

>> तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे. 

>> कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्र पाडावीत. तुळशीचे रोप लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावा. यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के, वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे. 

>> तुळशीचे रोप निवडताना त्याची पाने चांगली तपासून घ्यावीत. पाने मोठी, छान आणि हिरवीगार असतील आणि त्याला मोहोर असेल, तर ती तुळस चांगली मानली जाते. अशा तुळशीला प्लॅस्टिक आवरणातून बाहेर काढून कुंडीतील मातीत रुजवावे आणि वरून आणखी एक मातीचा थर रचावा व पहिल्या वेळेस व्यवस्थित पाणी टाकून घ्यावे आणि नंतर थोडे थोडे पाणी टाकत राहावे. यात कोकोपीटचाही वापर करता येईल. 

>> तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्य प्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मलूल होते आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे. 

>> तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर वीस-बावीस दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर एक दोन दिवसानंतर तुळशीची पाने धुवून मगच वापरावीत.

>> गोवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात एक दिवसभर भिजवून ते पाणी महिन्यातून एक दोनदा तुळशीला घालावे. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात. 

>> तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फोफावते. 

>> उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा तुळशीला पाणी घालावे, जेणेकरून तुळस कोमेजणार नाही. 

तुळशीच्या रोपाला कडुलिंबाचे तेल घातल्यास काय होते?

वास्तविक, कडुलिंबाचे तेल झाडावरील कीटकांपासून मुक्त होण्याचे काम करते. काही लोक बाजारातून कीटकनाशके आणतात आणि त्यांची झाडावर फवारणी करतात, ज्यामुळे तुम्ही तुळशीची पाने इतर कशासाठीही वापरू शकत नाही. रसायन असलेले कीटकनाशक फवारण्याऐवजी, तुळशीच्या रोपावरील  किडे दूर करण्यासाठी कढीलिंबाचे तेल वापरणे चांगले. हे कीटकांविरूद्ध प्रभावी प्रतिबंधक म्हणून कार्य करते. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये कोणतीही रासायनिक क्रिया होत नाही. चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या रोपात हे तेल कोणत्या पद्धतीने वापरणे चांगले.

कढीलिंबाचे तेल वापरण्याची योग्य पद्धत : 

तुळशीच्या झाडावर कढीलिंबाचे तेल फवारण्यासाठी प्रथम स्प्रे तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे कढीलिंबाचे तेल घाला. नंतर, चमच्याच्या मदतीने ते चांगले मिसळा. यानंतर, घरात पडलेल्या रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये ते रसायन भरा. आता तुळशीच्या पानांवर आणि संक्रमित भागांवर त्याचा वापर करा. त्यामुळे तुळशीच्या रोपातून किडे लवकर निघून जातात. तुमच्या तुळशीच्या रोपाला कीड लागली नसेल पण तुम्हाला कीड लागू नये म्हणून काळजी घ्यायची असेल तर कढीलिंबाची पाने बारीक करून तुळशीच्या रोपात घालून ठेवा. 

टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्स