शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Tulasi Plant Tips: तुळशीचे पावित्र्य जपले तरच लक्ष्मीचा घरात वास राहील; त्यासाठी पाळा 'हे'नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:37 IST

Tulasi Plant Tips: घरोघरी तुळशीचे रोपटे असते. त्या रोपाची निगादेखील राखली जाते, त्याबरोबरच जाणून घेतले पाहिजेत महत्त्वाचे नियम!

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला मानाचे स्थान आहे. तुळस भगवान विष्णूंना प्रिय असते. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. त्यामुळे ज्या घरात तुळस असते आणि जिथे तिची नित्य पूजा केली जाते, अशा घरांमध्ये लक्ष्मी माता सदैव वास करते. त्यामुळे तुळशीच्या वापरात काही नियम जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. ते नियम कोणते व त्याचे पालन कसे करायचे ते जाणून घेऊ. 

तुळशीच्या रोपाची पूजा करण्यासोबतच त्याला जल अर्पण करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. तसेच अनेक वेळा लोक काहीही विचार न करता तुळशीची पाने तोडतात. अशा स्थितीत विनाकारण तुळशीची पाने तोडल्याने मनुष्य पापात सहभागी होतो. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीची पाने तोडण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. चला शोधूया.

तुळशीची पाने खुडताना लक्षात ठेवा पुढील नियम : 

>>शास्त्रानुसार तुळस इतकी पवित्र आहे की भगवान विष्णूंनी ती आपल्या मस्तकावर ठेवली आहे. एवढेच नाही तर भगवान विष्णू, तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. म्हणून वैधृति और व्यतीपात या दोन योगांमध्ये चुकूनही तुळशीची पाने खुडू नयेत. या योगाची माहिती दिनदर्शिकेत दिलेली असते. ती रोजच्या रोज पाहण्याचा सराव ठेवावा. 

>>याशिवाय मंगळवार, रविवार आणि शुक्रवारी चुकूनही तुळशीची पाने खुडू नका. तसेच एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींनाही तुळशीची पाने खुडू नयेत.

>>घरात कोणाचा मृत्यू झाल्यास आपण सुतक पाळतो. सुतकाच्या वेळी देवाला स्पर्श करत नाही तसेच देव कार्यही करत नाही, त्याचप्रमाणे तुळशीचे पावित्र्य सोयर आणि सुतक या दोन्ही वेळेस काटेकोरपणे पाळावे. 

>>ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीची पाने तोडणे वर्ज्य ठरवले आहे. 

>>आंघोळ केल्याशिवाय अस्वच्छ हातांनी तुळशीची पाने तोडू नये. तुळस पवित्र असल्याने अंघोळ झाल्यानंतरच तिला स्पर्श करावा. तसेच तुळशीची पाने कधीही चाकू, कात्री न तोडता नखांनी अलगद खुडून घ्यावीत.