शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Tukaram Beej: संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमनाचे वर्णन त्यांचे शिष्य निळोबाराय यांच्या शब्दात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 07:00 IST

Tukaram Beej 2023: लौकिक जगात वावरूनही अलौकीक पातळीचा प्रवास करणारे तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचे त्यांच्या शिष्याने केलेले वर्णन!

>> रोहन उपळेकर 

९ मार्च रोजी फाल्गुन शुद्ध द्वितीया, अर्थात् श्री तुकाराम बीज. हा वारकरी संप्रदायातला एक सर्वात मोठा महोत्सव आहे. भगवान श्रीपंढरीनाथांचे परमभक्त सद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांची ही वैकुंठगमन तिथी, हा आम्हां वारकरी भक्तांसाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठाच सण आहे. आजच्याच पावन तिथीला सद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान श्रीपंढरीनाथांच्या विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले.

श्रीसंत तुकोबारायांचे परमशिष्य श्रीसंत निळोबाराय महाराज पिंपळनेरकर आपल्या नमनात म्हणतात,

तुका भासला मानवी देहधारी ।परि हा लीलाविग्रही निर्विकारी ।स्वयें श्रीहरी व्यापकु सर्वजीवा ।तुका तोचि तो हा परब्रह्म ठेवा ॥४॥जयां पूजिलें आदरें पांडुरंगें ।विमानस्थ केलें प्रयाण प्रसंगे ।तनु मानवी दिव्य रूपीच केली ।न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली ॥५॥

"आमचे सद्गुरुमहाराज हे जरी देहधारी भासत असले, तरी ते देहात राहूनही देहसंबंधात गुंतलेले नाहीत, ते या मायेतही पूर्ण निर्विकारीच आहेत. ते साक्षात् लीलाविग्रही भगवान श्रीहरीच आहेत व सर्व विश्व व्यापून उरलेले आहेत. तेच प्रत्यक्ष परब्रह्मरूप आहेत. अहो, ज्यांची साक्षात् परिपूर्णब्रह्म भगवान श्रीपांडुरंगांनी पूजा केली, ज्यांना प्रयाणाच्या प्रसंगी स्वहस्ते दिव्य विमानात बसवून आपल्या सोबत वैकुंठधामी नेले आणि आपला मर्त्य पांचभौतिक देह सुद्धा ज्यांनी दिव्यरूप केला, त्या सद्गुरु श्री तुकोबारायांचा अद्भुत महिमा म्या पामराने कुठवर कथन करावा ?"

खरोखरीच, श्री तुकोबा जन्मभर जे बोलले तेच त्यांनी प्रत्यक्ष करूनही दाखवले. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥ हे ते नुसते म्हणाले नाहीत, तर त्यांनी स्वत:च ते घडवूनही दाखवले. सद्गुरुकृपेने साधलेल्या सततच्या हरि-कीर्तनभक्तीने आपल्या पांचभौतिक देहासकट ते हरिरूप होऊन ठाकले होते. जे देहातच हरिमय झाले त्यांना देहत्यागसमयी त्या देहाची कसली बंधने अडवू शकणार सांगा बरं ? म्हणूनच, आतबाहेर हरिमय झालेले श्री तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. जशी सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी एकमेवाद्वितीय आहे, तसेच श्री तुकोबांचे वैकुंठगमनही अद्वितीयच आहे !!

फाल्गुन शुद्ध द्वितीयेच्या पावन तिथीच्या मध्यान्हीला, ३७३ वर्षांपूर्वी वैकुंठगमनाचा तो दिव्य सोहळा साकारला होता. म्हणून या मध्यान्हसमयी आपणही श्री तुकोबांच्या नामाचा जयजयकार करीत त्यांच्या वैकुंठगमनाचा सोहळा बसल्या जागी मनोभावे साकारूया आणि धन्य धन्य होऊया !! 

तुकीं तुकला तुका, विश्व भरोनि उरला लोकां!