शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या आयुष्यातही संकटांचा ससेमिरा सुरू आहे? मग या गोष्टीत दडले आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 08:00 IST

ज्याप्रमाणे सुख फार काळ टिकत नाही, त्याप्रमाणे दुःखही फार काळ टिकत नाही.

एक मुलगा अतिशय दुःखी होता. त्याच्या आयुष्यात दुःखांचा, संकटांचा ससेमिरा थांबतच नव्हता. शेवटी कंटाळून सगळ्या संसाराचा  त्याग करून तो एका डोंगरावर निघून गेला. तिथे त्याला एक साधू महाराज भेटले. त्याने त्यांना आपली व्यथा सांगितली. साधू महाराज म्हणाले, 'एवढंच ना, तुला मी एक उपाय सांगतो, त्यामुळे तुझे सगळे प्रश्न संपतील.' 

हे ऐकून मुलाला हायसे वाटते. साधू सांगतात. आज रात्री आपण डोंगराच्या पायथ्याशी जाऊ. जिथून तू वर चढत इथे आलास. तिथेच तुझ्या समस्येचे समाधान आहे. मुलाचे कुतूहल वाढते. तो साधू महाराजांबरोबर डोंगराच्या पायथ्याशी जायला निघतो. 

तिथे एक उंट पाळणारा दरवेशी असतो. मुलाला वाटते, साधू महाराज त्याच्याकडून माझ्या समस्येचे उत्तर देणार आहेत. उंट एका झाडाला बांधलेले असतात. दरवेशी शांत झोपलेला असतो. साधू महाराज तो उठण्याची वाट पाहत असतात. बराच वेळ जातो. रात्र चढत जाते. साधू महाराज सांगतात, 'एक काम कर, हे उंट झोपले, की तू ही झोपी जा. सकाळी तुझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊ आणि मग तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो. तोवर दरवेशी सुद्धा उठेल.' असे सांगून साधू महाराज झोपी गेले. 

मुलगा ताटकळत उंट झोपण्याची वाट पाहत राहिला. रात्र सरली. सकाळ झाली. दरवेशी उठला. साधू महाराजांनाही जाग आली. मुलगा त्या उंटांकडे बघत पेंगत बसलेला. त्याला पाहून साधू महाराज म्हणाले, 'काय रे, तू झोपलास की नाही?'मुलगा म्हणाला, 'कसं झोपणार महाराज? तुम्ही सांगितलेलं, सगळे उंट झोपले की मग झोप. इथे मात्र एक उंट झोपला की दुसऱ्या उंटाला जाग येईल. दुसरा उठला की त्याच्या आवाजाने तिसऱ्याला जाग येई. असे करत या सगळ्यांनी मला रात्र जागवली.' त्यावर साधू महाराज आणि दरवेशी हसू लागले. साधू महाराज म्हणाले, 'वेड्या हेच आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तर! एका मागून एक संकटांना जाग येतच राहणार. पण आपण त्यांच्याकडे किती वेळ लक्ष द्यायचं आणि कधी दुर्लक्ष करत शांत झोपी जायचं, हे या दरवेशाकडून शिक! तो सुद्धा तुझ्यासारखा उंटांवर पाळत ठेवत राहिला, तर त्याला कधीच झोपता येणार नाही. एका ठराविक मर्यादेनंतर सगळा भार देवावर सोपवून निश्चिन्त राहायला शिक, म्हणजे तुझ्या वाट्याला आलेल्या संकटांना तोंड देण्याचे बळ तुझ्यात आपोआप येईल.'

मुलाला ही गोष्ट पटली. त्याने साधू महाराजांचे आभार मानले आणि दरवेशाचा आदर्श ठेवून आपल्या घराकडे प्रयाण केले. त्यामुळे यापुढे आपल्याही मागे संकटांचा ससेमिरा लागला, तर या दरवेशाची आठवण नक्की काढा आणि परमेश्वरावर भार सोपवून निवांत राहा.