शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Travel: स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलीत? आता ३६९ फूट उंच शिवमूर्ती बघून या, वाचा सविस्तर माहिती आणि वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:50 IST

Shiva Murty Rajasthan: राजस्थान येथील जगातील पाचव्या उंच शिव मूर्तीचे अलीकडेच लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रेक्षणीय स्थळाला अवश्य भेट द्या.

भगवान शिव हे देवांचे देव आहेत म्हणून त्यांना महादेव म्हणतात. शिवाचा महिमा अमर्याद आहे. जगभरात शिवाच्या अनेक मूर्ती आहेत. राजसमंद येथील नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर अलीकडेच शिवाची मूर्ती बसवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया मूर्तीचे वैशिष्ट्य आणि त्याची निर्माण कथा!

जगातील पाचवी सर्वात मोठी शिव मूर्ती

भारतात शिवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तसेच अनेक ठिकाणी उंच शिवमूर्ती आहेत. अलीकडेच राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे भगवान शिवाची मूर्ती बनवण्यात आली आहे. सुमारे १० वर्षे त्याचे काम सुरू होते. ही मूर्ती घडवण्याचा पाया संत मोरारी बापूंनी घातला होता. हा पुतळा अनेक अर्थांनी विशेष आहे कारण हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. या मूर्तीची उंची ३६९ फूट असून तिला विश्वास स्वरूपम असे नाव देण्यात आले आहे.

या भगवान शंकराच्या इतर मोठ्या मूर्ती आहेत

  • नेपाळमध्ये शिवाची १४३ मीटर उंच मूर्ती आहे. कैलाशनाथ महादेव या नावाने ती ओळखले जाते.
  • भगवान शिवाची दुसरी सर्वात उंच मूर्ती १२३ मीटर आहे. हे कर्नाटकात आहे, ज्याला मरुडेश्वर म्हणतात.
  • आदियोग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मूर्तीबद्दल बहुतेकांना माहिती आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर शहरात बनवण्यात आली आहे. ती सुमारे ११२ मीटर उंच आहे.
  • मॉरिशसमध्ये मंगल महादेवाची १०८ मीटर उंच मूर्ती बसवण्यात आली आहे.

ही मूर्ती कोणी बनवली?

शिवाची ही मूर्ती नरेश कुमार यांनी बनवली आहे. ते राजस्थानातील पिलानी गावचे रहिवासी आहेत. ही मूर्ती त्यांनी मानेसरमध्ये बनवली.

भगवान शंकराचा जलाभिषेक भगवान शंकराच्या जलाभिषेकासाठी माथ्याजवळ दोन टाकी बसवण्यात आल्या असून, त्यामध्ये गंगेचे पाणी भगवान शिवाच्या जटांवरून एका कुंडातून वाहून जाईल. आणि दुसरी टाकी आपत्कालीन स्थितीसाठी राखीव ठेवली आहे.

मूर्तीचे वैशिष्ट्य काय?

  • या मूर्तीमध्ये भगवान शिव ध्यानस्थ बसलेले आहेत.
  • मूर्तीच्या उंचीमुळे ती लांबूनच दिसते.
  • पुतळा पाहण्यासाठी २८० फुटांवर लिफ्ट जाईल, जिथून तुम्हाला अरवली टेकडीचे सुंदर दृश्य पाहता येईल.
  • याशिवाय तुम्हाला लिफ्टमधून भगवान शंकराचे त्रिशूलही पाहता येणार आहे.
  • लोकांना आरामात बसता यावे म्हणून याठिकाणी हॉलही बनवण्यात आला आहे.
  • या मूर्तीला अडीच हजार वर्षे काहीही होणार नाही, असे मूर्तिकाराने सांगितले आहे.
  • रात्रीच्या वेळी मूर्ती शोभिवंत दिसावी म्हणून लेझर लाईटनेही मूर्तीची सजावट करण्यात आली आहे.
  • नंदीशिवाय शिव अपूर्ण आहे असे म्हणतात. अशा परिस्थितीत २५ फूट उंच आणि ३७ फूट रुंद शिवासमोर नंदीची मूर्तीही बनवण्यात आली आहे.

राजसमंद शहराचे वैशिष्ट्य काय आहे?

सरोवरावरून राजसमंद शहराचे नाव पडले आहे. मेवाडच्या राणा राज सिंह यांनी १७ व्या शतकात राजसमंद तलाव बांधला. तुम्ही हा पुतळा बघायला गेलात तर तुम्हालाही या तलावाच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. हा तलाव नाथद्वारापासून २५-३० मिनिटांच्या अंतरावर आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्स