शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जे ठरवतात ते मिळवतातच!; हे वैशिष्ट्य आहे मे मध्ये जन्मलेल्या लोकांचे; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 09:02 IST

थोडेसे जिद्दी, शीघ्रकोपी, राजेशाही थाटात राहणारे आणि बरेच काही...

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते  आणि त्यांना अमाप लोकप्रियता मिळते. थोडेसे निष्काळजी आणि थोडेसे शीघ्रकोपी असतात. जे ठरवतात ते मिळवतात. त्यांचा स्वभाव राजसी असतो, त्यामुळे थोडी अहंकारी वृत्ती असते. तसेच त्यागाचीही वृत्ती असते. 

साधे राहणीमान यांना मानवतच नाही. प्रत्येक गोष्टीत राजेशाही थाट लागतो. त्यांची स्वत: काम करण्याची तयारी कमी आणि दुसऱ्यांकडून काम करवून घेण्याची सवय जास्त असते. घरातल्या सदस्यांनी घरात आवराआवर करावी अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु स्वत:च्या कामाचा पसारा त्यांना आवरत नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असल्याने चारचौघात उठून दिसत़े घरात ते कसेही राहत असले, तरी बाहेर अगदी टापटिप राहतात. 

प्रेम आणि सांसारिक आयुष्याबाबत त्यांना मजा मस्करी आवडत नाही. ते आपली मर्यादा ओलांडत नाहीत. अनैतिक गोष्टींना त्यांच्याकडे अजिबाब वाव नसतो. भविष्याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट असतात. ते आपल्या जोडीदाराकडून कधी प्रेमाने तर कधी अरेरावी करून मनासारखे काम करवून घेतात. मैत्रीच्या बाबतीत ते अतिशय प्रामाणिक असतात. शेवटपर्यंत आपली मैत्री निभावतात. 

पत्रकार, लेखक, संगणक अभियंता, पायलट, डॉक्टर, प्रशासन अधिकारी अशा मोठ्या हुद्द्यापर्यंत यांचा प्रवास जातो. मुलींना फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात गती मिळते. 

या लोकांचा कोणी विश्वासघात केला, तर ते त्यांच्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवत नाहीत. एवढेच काय, तर त्यांच्याशी पुनश्च संबंधही ठेवत नाहीत. प्रत्येक नात्यात ते अतिशय गुंतून जातात आणि समोरच्याकडूनही तेवढ्याच प्रेमाची अपेक्षा ठेवतात. या स्वभावाचा कधी त्यांना तर कधी इतरांना त्रास होतो. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती प्रेम करताना हात राखत नाहीत. आपले सर्वस्व अर्पण करून टाकतात. याच स्वभावाचा फायदा अनेक जण घेतात त्यामुळे त्यांचे हितशत्रू वाढत जातात. अति स्पष्टवक्तेपणामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते, याची त्यांना जाणीव होत नाही. ते आपलेच म्हणणे खरे करतात. त्यामुळे यांच्या आयुष्यात अनेक लोक येऊनही त्यांचे हितसंबंध फार काळ टिकत नाहीत. यासाठी त्यांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे गरजेचे आहे. 

मे महिन्यात महाराणा प्रताप, स्वा. वि. दा. सावरकर, रवींद्रनाथ टागोर, माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, करण जोहर, परेश रावल, विकी कौशल, असबुद्दीन ओवेसी, विलासराव देशमुख, नितीन गडकरी, उद्योगपती आनंद महिंद्रा इ. प्रख्यात व्यक्तींचा वाढदिवस असतो. तुमचाही वाढदिवस या महिन्यात असेल, तर वरील गुणविशेष तुमच्याशी जुळतात का हे ताडून पहा...!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष