शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी 'या' चुका करून शनिपीडा ओढवून घेऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 16:29 IST

शनिदेव शिस्तप्रिय आहेत, शिस्तीने वागणाऱ्याला ते कधीच त्रास देत नाहीत. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षेशिवाय सोडतही नाहीत!

सर्व ग्रहांमध्ये मनुष्य घाबरतो ते शनी ग्रहाला. कारण शनी महाराजांची अवकृपा झाली, तर कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची आपल्याला भीती वाटत राहते. साडेसाती झालेल्यांना चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. या काळात कोणाचा उष्कर्ष होतो, तर कोणाला आयुष्यभराची शिकवण मिळते. साडेसाती देव दानवांनाही चुकलेली नाही, तर मानवाला तरी कशी चुकेल? या काळात आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे हेच महत्त्वाचे असते. शनी महाराज आपली परीक्षा घेत असतात. त्यावेळी न डगमगता आपण तत्वाला धरून आचरण केले पाहिजे आणि या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत. 

>> शनी महाराज अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांना अभक्ष्य आणि अपेयपान करणारे लोक आवडत नाहीत. म्हणून मांसाहार आणि मदिरापान करू नये. तसेच कोणाला दुखावणे, वाईट बोलणे, दुष्कृत्य करणे टाळले पाहिजे. त्याची भयंकर शिक्षा आपल्याला मिळू शकते. कारण शनी महाराज आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. 

>>  शनी महाराजांना ज्येष्ठ व्यक्ती आणि गरीब लोकांप्रती जास्त कणव असते. अशा लोकांना दुखावलेले, फसवलेले त्यांना अजिबात चालत नाही. एखाद्याची फसवणूक केली पण त्याला ती कळली नाही, तर यात आनंद मानू नका. कारण दुसऱ्याची फसवणूक केल्याची शिक्षा शनी महाराज नक्कीच देतात आणि ती शिक्षा भोगताना मात्र मनुष्य रडकुंडीला येतो. 

>> साडेसातीच्या काळात लोखंड, तेल आणि केरसुणीची खरेदी करू नये. या वस्तूंची खरेदी शनी महाराजांना अपमानास्पद वाटू शकते. या वस्तूंची खरेदी करण्याऐवजी शनिवारी या वस्तूंचे दान केले पाहिजे. तसेच काळे तीळ आणि उडीद डाळ दान केल्यास खूप लाभ होतो. 

>> पिंपळाच्या झाडावर शनी देवांचा वास असतो असे मानतात. परंतु घराच्या भिंतीवर उगवलेले पिंपळाचे रोपटे अशुभ मानले जाते, म्हणून ते वेळीच काढून टाकले जाते. परंतु साडेसातीच्या काळात पिंपळाचे मूळ उपटून शनी महाराजांचा रोष ओढवून घेऊ नये. उलट दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून यावे. 

>> ज्येष्ठ आणि गरीब व्यक्तींची सेवा सुश्रुषा केली असता शनी महाराज प्रसन्न होतात. म्हणून केवळ साडे सातीच्या काळातच नाही, तर अन्य वेळीसुद्धा ज्येष्ठांचा आदर करावा आणि गरीब, गरजू लोकांना यथाशक्ती दान करावे. त्यामुळे शनी महाराज प्रसन्न राहतात.