शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पितरांना सद्गती मिळावी म्हणून करतात सोमवती अमावस्येचे व्रत; वाचा मुहूर्त, विधी आणि महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 10:53 IST

या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात.

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्येला चंद्र दर्शन होत नाही. तिलाच दर्श अमावस्या असेही म्हणतात. १२ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे. आगामी काळात सोमवती अमावस्या येणार नसल्यामुळे १२ तारखेच्या सोमवती अमावस्येचे महत्त्व विशेष वाढले आहे. 

सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते. 

सोमवती अमावस्येचे महत्त्व :सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

पूजेचा विधी: सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करून शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे. 

पूजेचा शुभ मुहूर्त :अमावस्या तिथि: १२ एप्रिल, सोमवारसोमवती अमावस्येचा प्रारंभ: ११ एप्रिल, रविवार प्रात: ६ वाजून ३ मिनिटांपासून सोमवती अमावस्येचे चे समापन: १२ एप्रिल सोमवारी को सकाळी ८ वाजेपर्यंत