शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 10:47 IST

विवाहासारख्या सुंदर सोहळ्यात कन्या ही उत्सवमूर्ती असताना तिला 'दानाची वस्तू' कसे ठरवले जाईल, हा साधा विचार आपण केला पाहिजे.

'कन्यादान नाही कन्यामान', अशी कुठलीशी ओळ कोणा अभिनेत्रीने वापरली आणि चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली. मूळात आपली संस्कृती, परंपरा, रूढी यामागील अर्थ समजावून न घेता  'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असे आपण वागतो. आपल्या परंपरेतील कोणत्याही गोष्टी बिनबुडाच्या अजिबात नाहीत. परंतु पुरोहित जेव्हा त्या गोष्टींची उकल करून सांगत असतात, तेव्हा आपण ते लक्ष देऊन ऐकत नाही, पोथ्या-पुराणं-उपनिषदात दिलेली माहिती समजावून घेत नाही आणि नवीन बदल घडवू पाहतो. आता कन्यादानाचा विषय निघालाच आहे, तर त्याबद्दल सविस्तर समजावून घेऊ.

हिंदू विवाह पद्धतीत प्रत्येक विधीचा शास्त्रशुद्ध अर्थ आहे. मात्र  हे विधी सुरू असताना लोकांच्या भेटीगाठी घेण्यात, फोटाग्राफरला पोज देण्यात, वधू वराचे एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकण्यात गुरुजींच्या सूचनांकडे दुर्लक्ष होते आणि त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. प्रेत्यक विधीमागील अर्थ हा सुखी संसाराचा कानमंत्र आहे. तो लक्षपूर्वक ऐकावा. 

आपल्याकडे विवाह सोहळ्याची आखणी अतिशय सुंदर केलेली आहे. विहिणींची भेट, व्याह्यांची भेट, करवलीचा मान, कानपिळीचा मान, मामाचा मान, काकांचा मान, मंगलाष्टक म्हणताना आत्या, आजी, मामी, मावशीचा मान अशी सगळ्यांची दखल घेतलेली आहे. अशा या सुंदर सोहळ्यात कन्या ही उत्सवमूर्ती असताना तिला 'दानाची वस्तू' कसे ठरवले जाईल, हा साधा विचार आपण केला पाहिजे. 

दान म्हणजे देणे. कन्यादान म्हणजे कन्या देणे एवढा सोपा अर्थ आहे. इतर वस्तूंचे दान करताना 'इदं न मी मम' असे म्हणतो, परंतु मुलगी देताना वराकडून वचन घेतले जाते. मुलगी काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, 'विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा व दोघांनी सुखाचा संसार करा.' असे वचन घेतात.त्यावर 'नातिचरामि ' म्हणत वर म्हणतो, 'तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.'

केवढी मोठी जबाबदारी आहे ही! देवाब्राह्मणाच्या, नातेवाईकांच्या, आप्तेंष्टांच्या साक्षीने वधूपित्याने नवरदेवाकडून घेतलेले हे वचन आहे आणि त्यानेही पूर्ण विचारांती दिलेला शब्द आहे. तो शब्द पाळण्यासाठी तो कटिबद्ध झालेला आहे. 

हा प्रसंग, हा क्षण, हा विधी म्हणजे कन्यामानच नव्हे का? मग कन्यादान या शब्दात वावगे वाटण्यासारखे उरते तरी काय? ही केवळ खाजवून काढलेली खरूज आह़े. ती वाढण्याऐवजी वेळीच शमवलेली बरी! त्यासाठी माहितीचे, ज्ञानाचे, विचारांचे मलम हवे. त्यामुळे नवीन प्रथा पाडताना जुन्या प्रथा आधी समजावून घेऊया आणि आधुनिकतेला, जाहिरातबाजीला न भुलता आपली संस्कृती, परंपरा, वेद, शास्त्र, पुराणे यांचा सन्मान करूया.