शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेल्या लोकांवर शुक्र-लक्ष्मी कृपा; कामे होतात पटापट, असतात मनी माइंडेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 07:52 IST

Numerology: या मूलांकाच्या व्यक्तींना विलासी जीवन जगायची आवड असते. शुक्र-लक्ष्मी देवीच्या कृपेने अपार यश मिळते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. १ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. आताच्या घडीला शुक्र कुंभ राशीत विराजमान आहे. याच राशीत नवग्रहांचा न्यायाधीश शनी ग्रह आहे. शुक्र आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. त्यामुळे शुक्र-शनीची युती शुभ मानली जातो. शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. या मूलांकाच्या व्यक्ती हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात. तसेच या मूलाकांच्या व्यक्तीवर शुक्रासह लक्ष्मी देवीची कृपा असल्याचे सांगितले जाते. 

पैसे खर्च करण्याचीही असते आवड 

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती शिक्षणातही चांगल्या असतात. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते. या लोकांची कामे शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात.

कोणत्या क्षेत्रात मिळते अपार यश?

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती मीडिया, फॅशन डिझायनिंग किंवा अभिनयाचा कोर्स केला तर त्यांना चांगले यश मिळू शकते. यासोबतच कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यापार, उद्योग, व्यवसाय खूप प्रगती देऊ शकतो. फिक्कट निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग या मूलांकांच्या व्यक्तींसाठी सर्वांत शुभ मानला जातो.

पैसे कमवण्याची जबरदस्त हौस

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. या लोकांना पैसे कमवण्याची जबरदस्त हौस असते. त्यासाठी ते कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही मेहनत घेतात. या लोकांना मनी माइंडेड असेही म्हणतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष