शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डोळा लवण्यामागे शुभ-अशुभ कारण असते की वैज्ञानिक कारण? चला जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 13:18 IST

आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

कधी कधी कोणाच्या विश्वासावर विश्वास ठेवावा. नाही म्हणजे, हे काही शास्त्रात सांगितले नाही, पण मानसशास्त्रात नक्कीच सांगितले आहे. एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम नसतील आणि आपण 'हो' म्हटल्याने कोणाला दिलासा मिळत असेल, तर सूरात सूर मिसळायला काहीच हरकत नाही. 'असे काही नसते' म्हणत समोरच्याच्या भावना दुखावण्यापेक्षा 'मम' म्हणत एखाद्या गोष्टीला पुष्टी द्यावी. याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणे म्हणत नाहीत, तर मन राखणे असे म्हणतात. अशीच एक भोळी भाबडी समजूत,

डावा डोळा लवतोय, म्हणजे शुभवार्ता समजणार?

डोळा लवणे, याचे शास्त्रीय कारण अगदी क्षुल्लक आहे. कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

मनुष्याला जगायला आशेचा एक किरण पुरेसा असतो. कधी न घडणारी गोष्ट अचानक घडू लागली, की आपण त्या कृतीमागचा अर्थ शोधू लागतो. त्यातही सोयीस्कर सकारात्मक अर्थ काढून मनाची समजूत घालणे, हा तर मनुष्यस्वभाव! डावा डोळा लवणे, या क्रियेचा संबंध शुभवार्तेशी लावून मनुष्य मोकळा झाला. पण, बिचाऱ्या  उजव्या डोळ्याची आपबिती ऐकून, तो पुरुषांसाठी शुभ ठरवला गेला. यात तथ्य किती हा भाग वेगळा, परंतु, चांगल्या विचारांनी काही चांगले घडावे, एवढाच त्यामागचा हेतू. 

कवयित्री शांता शेळकेसुद्धा लवणाऱ्या डाव्या डोळ्यामागील स्त्रीमन आपल्या काव्यातून रेखाटतात, 

माजो लवतोय डावा डोळा, जाई-जुईचो गजरो माळता,रतन अबोली केसात फुलता, काय शकुन गो सांगताय माका...!

काहीतरी छान घडणार, ही आशा माणसाला जगायला बळ देते. वाईट गोष्टी घडतच असतात, परंतु चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाट बघावी लागते. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणारे आपले मन शुभ शकुनांमुळे अधिक वेग घेते. आकाशाला हात लावू पहाते. याउलट, काही विपरित घडले, की आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

एकदा, एका लहान मुलाच्या धक्क्याने पाहुण्यांच्या घरी, परदेशातून आणलेली काचेची फुलदाणी फुटली. रंगात आलेल्या गप्पा-गोष्टींना खळ्ळ्खट्याक झाल्यामुळे एकाएक थांबल्या. टाचणीच्या आवाजानेही कानठळ्या बसतील, एवढी शांतता घरात पसरली. चुप्पी कोण तोडणार, सगळे याच विचारात होते. लहान मुलाला तर आज आपली कोणीही गय करणार नाही, हे चित्र स्पष्टच दिसत होते. त्यावेळी, त्या घरातल्या आजी पुढे सरसावल्या आणि मुलाला जवळ घेत त्यांनी म्हटले, 'तुझ्यामुळे घरावर येणारे मोठ्ठे अरिष्ट टळले.' आजींच्या एका वाक्याने वातावरणात सहजता आली. राग, द्वेष, नुकसान सर्व गोष्टींचा क्षणात निचरा झाला. आता, याला अंधश्रद्धा म्हणाल, की समजुतदारपणा? तीच बाब डाव्या डोळ्याची आहे. डोळ्याच्या लवण्याने कोणाचे भले होत असेल, तर होऊ द्या, त्यांच्यावर तुम्ही डोळे काढू नका.