शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

गुरूच्या अस्तामुळे एक महिना विवाह मुहूर्त नाहीत; विवाहोत्सुक तरुणाईला थोडे थांबावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 11:55 IST

आता मे-जूनमध्येच लग्नाचा धूमधडाका

श्यामकांत सराफ, लोकमत न्यूज नेटवर्क, पाचोरा (जि. जळगाव) : गेल्या पाच महिन्यांपासून सर्वत्र सुरू असलेली लग्नसराईची धामधूम गुरुच्या अस्तामुळे थंडावणार आहे. यामुळे विवाहोत्सुक तरुण-तरुणींच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.  गुरुच्या अस्तामुळे एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे मे व जून महिन्यांत लग्नाचा धूमधडाका उडणार आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत अडचण

मे महिन्यात १४ तर जूनमध्ये १२ अशा एकूण २६ विवाह मुहूर्तांच्यापैकी काही महत्त्वाच्या तारखांसाठी आतापासूनच वधू व वराकडील मंडळींनी मंगल कार्यालय, मंडप केटरर्स, वाजंत्री बुक करायला सुरुवात केली आहे. विवाह विधीसाठी गुरुबल असणे आवश्यक असते. एप्रिल महिन्यात गुरुचा अस्त असल्याने हा काळ विवाहासाठी वर्ज्य ठरवण्यात आला आहे. त्यामुळे मे, जून महिन्यांत लग्नासाठी मंगल कार्यालय मिळणे मोठे कठीण जाणार आहे. पुढे जुलै ते २७ नोव्हेंबरपर्यंत गुरुचा अस्त व त्यातून चातुर्मास असल्याने नोव्हेंबर अखेरपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे.

केवळ गौण काळात विवाह मुहूर्त

एप्रिल महिन्यात गुरुचा अस्त असला तरी या महिन्यात काही गौण काळाचे मुहूर्त आहेत. मुला-मुलींची पत्रिका व कुंडली पाहून विवाह करता येऊ शकतात. -विनायक जोशी, पुरोहित

असे आहेत विवाह मुहूर्त

मे- २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३० जून- १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

(जुलै ते २७ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा गुरुचा अस्त व चतुर्मासमुळे विवाह मुहूर्त नाही.) 

टॅग्स :marriageलग्न