शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

...दहा हजार वर्षं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 04:54 IST

आपण प्रवासात असलो, की सारखे विचारले जाणारे प्रश्न.. आपण पोहोचलो का तिथे? अजून किती वेळ आहे? मग कधी पोहोचणार?

- धनंजय जोशीसुट्टीसाठी म्हणून सगळ्या कुटुंबाला, मुलांना घेऊन प्रवासाला जाणाऱ्यांना हा अनुभव आला असेलच. आपण प्रवासात असलो, की सारखे विचारले जाणारे प्रश्न.. आपण पोहोचलो का तिथे? अजून किती वेळ आहे? मग कधी पोहोचणार?तशीच एक गोष्ट ! उंंटाचं एक कुटुंब वाळवंटात फिरत असतं - वडील उंट, आई उंट आणि बेबी उंट ! वडील उंट जरा शांत प्रकृतीचे असतात. बेबी उंट सारखा एकच प्रश्न विचारत असतो, ‘बाबा, आपण पोहोचलो का?’वडील उंट उत्तर देतात, ‘तुला किती वेळा सांगितलंय मी, की आपली भटकणारी जात आहे. आपण कधीही कुठेही पोहोचत नसतो. त्यामुळे आपण फक्त आनंदाने प्रवास करायचा. ‘पोहोचणार कधी?’ असे प्रश्न विचारायचे नाहीत.’ ही गोष्ट पहिल्यांदा वाचली तेव्हा मला जरा हसू आलं. वाटलं, हे वडील उंट बहुतेक सान सा निम यांना पूर्वीच्या आयुष्यात भेटलेले असावेत. सान सा निम आम्हाला सांगायचे, ‘ट्राय, ट्राय, ट्राय, टेन थाउजंड इयर्स, नॉन-स्टॉप!...’ तुमचं काम एवढंच, की फक्त प्रामाणिकपणे साधना करायची. हे करून आपण कुठे पोहोचणार आणि काय मिळवणार याचा विचार नाही करायचा!आता दहा हजार वर्षं म्हटल्यानंतर लगबगीने कुठे पोहोचण्याची घाई निघूनच गेली की नाही? आपल्या आयुष्यात अगदी आपल्या दैनंदिन जीवनात ही घाई आपल्याला उगाचच चिंतित करून जात असते. काहीही करून कुठे ना कुठेतरी पोहोचण्याची जरूरच समजा नाहीशी झाली की, आपण शंभर टक्के ‘आत्ताच्या क्षणी’ जगू शकू... ‘आत्ता’ जे आहे, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करू शकू!! एका प्रसिद्ध झेन गुरुंना त्याच्या शिष्याने विचारलं, ‘मास्टर, माझी साधना म्हणजे एखाद्या शिडीवर चढून गेल्यासारखी वाटते. चार पायºया वर आणि तीन पायºया खाली ! मी काय करू?’झेन गुरु म्हणाले, ‘ते शिडी वगैरे सोडून दे. आपण कुठेही जायचं नाही, की कुठेही चढायचंही नाही. आपलं सगळं काम जमिनीवर!’