शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Temple: ठाण्याच्या बाजारपेठेत दडले आहे पेशवेकालीन विठ्ठल मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:02 IST

Temple: आषाढी एकादशीचा माहोल तयार होऊ लागला आहे, अशातच तुम्हीदेखील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी!

ठाणे शहराला दीड-दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. हे शहर जसे तलावांसाठी ओळखले जाते, तसे प्राचीन मंदिरांसाठीदेखील ओळखले जाते. पोर्तुगीजांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर इथल्या प्राचीन मंदिरांचा विध्वंस केला आणि ठाण्याची शिल्पांनी नटलेली मंदिरे नष्ट झाली. पुढे मराठ्यांनी ठाणे जिंकले आणि ठाण्यातील मंदिरांना अभय मिळाले. अशाच आक्रमणातून स्वतःचे अस्तित्त्व अबाधित ठेवलेले २०५ वर्ष जुने विठ्ठल मंदिर अनेक ठाणेकरांनाही माहीत नाही. मूळचे ठाणेकर असलेले  मकरंद जोशी या मंदिराची सविस्तर माहिती देतात-

ठाण्याच्या पश्चिमेला स्टेशनलगत मोठा बाजार भरतो. हा परिसर विविध दुकानांनी आणि गर्दीने दिवसभर गजबजलेला असतो. याच गर्दीत हे प्राचीन विठ्ठल मंदिर गुडूप झाल्याने लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. मात्र तिथे नेहमी जाणारे भाविक गर्दी लोटून विठोबा-रखुमाईची नित्याने भेट घेतात. 

सन १७४८ मध्ये हे मंदिर पंडित नावाच्या पुरोहितांकडे सोपवण्यात आले. पुढे सन १८१७-१८मध्ये पंडितांच्या यजमानांनी ठाणे शहरात मध्यवस्तीत एक मोठे देवालय बांधले.या नव्या मंदिरात मुख्य मुर्ती विठ्ठल-रखुमाईच्या बसवण्यात आल्या.त्याबरोबरच श्रीरामेश्वर लिंग आणि श्री गणपतीची स्थापना करण्यात आली.यावेळी पंडित घराण्यातील विश्वनाथ विनायक पंडित हे उपाध्ये होते त्यांनी नाशिक,त्र्यंबक,वाई या क्षेत्रांतील शुक्लयजुर्वेदिय ब्राह्मणांना निमंत्रित करुन या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंडित घराणे या मंदिराचे कायदेशीर विश्वस्त बनले. वंशपरंपरेने पंडित कुटुंबीय या मंदिराची देखभाल करत आहेत. आता यतीन अच्युत पंडीत या मंदिराचे व्यवस्थापन बघतात. २०१६ मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले त्यावेळी मूळच्या मूर्तींमध्ये श्री सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीची भर घालण्यात आली आहे.

आजपर्यंत या विठ्ठल मंदिरात  मामासाहेब दांडेकर, जेजूरकर महाराज यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अनेक नामवंत किर्तनकारांनी किर्तन सेवा दिली आहे.तसेच दरवर्षी महिला विशेष किर्तन सप्ताहाचेही आयोजन केले जाते.त्याचप्रमाणे भागवतसप्ताह,गीता सप्ताह,अखंड हरिनाम सप्ताह असे विविध सप्ताह आयोजित केले जातात.दरवर्षी या मंदिरात साजरा होणारा आषाढी एकादशीचा सोहोळा ठाणे आणि परिसरातील वारकरी संप्रदायिकांचे आकर्षण असतो. 

टॅग्स :Templeमंदिर