शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

`त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि'... ज्ञान आणि विज्ञानाचा पुरस्कर्ता गणपती बाप्पा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 10, 2020 12:21 PM

आज जागतिक विज्ञान दिवस आणि मंगळवार. गणपती बाप्पा  हा विज्ञानाचा पुरस्कर्ता. म्हणून अथर्वशीर्षात त्याचा उल्लेख `त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि' अर्थात तू ज्ञानाचा आणि विज्ञानाचा देव आहे, असा केला आहे. 

ज्योत्स्ना गाडगीळ

विज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. आपल्या आसपास असलेल्या गोष्टीचे मूळरूप काय, भाकड काय नि वास्तव काय व त्याचे फायदे आणि उपयोग काय याची माहिती शोधाभ्यास करून जगासमोर मांडणे म्हणजेच विज्ञान. गणपती बाप्पादेखील कधीच ऐकीव माहितीवर विश्वास ठेवत नाही. तो आपल्या सुपासारख्या कानांनी चांगल्या वाईट गोष्टींची शहानिशा करून घेतो आणि कोणताही निर्णय घेताना आपल्या बारीक डोळ्यांनी दूरवरचे पडसाद लक्षात घेऊन कृती करतो आणि आपणही तसेच वागावे अशी शिकवण देतो.

अज्ञान माणसाला अंधविश्वासी आणि अपरिपक्व बनवते तर शुद्ध ज्ञान (विज्ञान) माणसाला वास्तविक, तर्कसंपन्न, विवेकशील आणि विचारशील बनवते.मुळात विज्ञान हे माणसाच्या अंतर्ज्ञानात आहे. मनात निर्माण झालेला प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी सुरु झालेली प्रक्रिया ही स्व मधूनच सुरु होते आणि मग त्याला भौतिकरूप प्राप्त होते.

हेही वाचा : पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!

आपल्या भारताची वैज्ञानीक पार्श्वभूमी फार-फार जुनी आहे. मनःशक्ती, आत्मज्ञान आणि अंतर्ज्ञान यांच्या जोरावर सर्वात शुद्ध ज्ञान म्हणजेच ‘विज्ञान’ जगासमोर मांडणारा सर्वात प्राचीन देश कोणता असेल तर तो भारतच. ग्रहांच्या स्थितीवर आधारित ज्योतिषशास्त्र असो, हजारो वनस्पतीचा उपयोग करून आजारांवर मात करणारे आयुर्वेद असो, विमान याबद्दल माहिती देणारी पुराणे असोत, मेडीटेशन योगापासून ड्राय बॅटरी पर्यंत व विषाचा शोध घेणाऱ्या स्फटीकांपासून आणि यासोबत बरीच काही माहिती देणारे पुराण आणि वेद आपल्याकडे आहे. तरीदेखील भारताची ही पाश्र्वभूमी न तपासताच लोक विचारतात की, ‘भारतात शोध का लागत नाहीत? विज्ञानात योगदान किती?’

डॉ. रमण , डॉ. होमी जहांगीर भाभा, रामानुजन,सत्येंद्र बोस, जगदीश बोस, विक्रम साराभाई, रे, भटनागर, सहानी, रमणचंद्र, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि अनेक... आज भारतात जी काही प्रगती आहे ती यांच्या भूतकाळातील योगदानामुळेच. तसेच मंगळयान, चंद्रयान या इसरोच्या प्रयोगानंतर जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. 

चांगला वैज्ञानिक तोच बनू शकतो, ज्याच्याकडे चांगले आध्यात्मिक ज्ञान आहे. १७ व्या शकतातील वैज्ञानिकांपासून ते आजपर्यंतच्या वैज्ञानिकांची जीवनी वाचल्यावर हेच लक्षात येते की त्यांनी मिळवलेल्या वैज्ञानिक यशामागे आध्यत्मिक ज्ञानाचे मोठे योगदान आहे. विज्ञान आणि आध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचा उपयोग हा शोध घेण्यासाठी आणि शुद्ध ज्ञान जगासमोर आणण्यासाठीच आहे. 

अध्यात्म हा अंतर्मनाचा शोध घ्यायला शिकवते, तर विज्ञान भौतिक जगाचा शोध घेण्यास शिकवते. त्यामुळे एकाला डावलून दुसऱ्याला नाकारणे योग्य होणार नाही. म्हणून बाप्पाच्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानाचा संगम आढळून येतो. तोच आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवुया आणि अध्यात्म व विज्ञानाची योग्य सांगड घालून आजचा विज्ञान दिवस साजरा करूया.

हेही वाचा : अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...