शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 12:16 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२८ एप्रिल ते ४ मे===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून चांगला आधार, मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. तुम्हाला एखादी लहान भेटवस्तू मिळू शकते. कामामध्ये कौतुक होऊ शकतं.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा. घरातल्यांसोबत थोडा निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. तुमच्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला फोन करा, त्यांना जमेल तशी मदत करा. ग्रहणशील रहा. मन जिंकून जग जिंका!

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी वेग वान असणार आहे.  झटपट गोष्टी घडतील.  तुमचे अडकलेले काम नक्कीच या काळात मार्गी लागणार अशी खूप शक्यता आहे.  तुम्हाला कुठेतरी सारखी ये जा करावी लागू शकते. लगीनघाई असल्यासारखे वाटेल.  चांगल्या कामासाठी धावपळ होईल. कष्टांचे सार्थक होईल. 

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. तुमच्या कडून कोणताही उशीर करु नका. तुमचे संभाषण संवाद यांकडे लक्ष द्या. बर्‍याच घटना घडतील त्यामुळे उत्साह ठेवा आणि जमेल तितका तुमचा सक्रिय सहभाग ठेवा. काही कामांचा आपणहून पाठपुरावा करा. जितके कष्ट कराल तितके फळ हे निश्चित!

नंबर 3:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहून त्यांना तुमच्या आनंदात सामील करुन घ्या. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष