साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१६ ते २२ फेब्रुवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी अधिकाराचा आणि वर्चस्वाचा असणार आहे. तुम्ही करत असलेले काम मोठे होईल. विस्तार होईल. तुम्हाला एक महत्त्वाचा टप्पा गाठता येईल. बऱ्याच गोष्टींची सूत्रे तुमच्या हातात असतील. त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे. वडील किंवा मोठ्या आदरणीय व्यक्तींचा दबदबा राहील.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतः राजा आणि बाकीचे प्रजा अशी भावना येऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. पण याचे रुपांतर पोकळ डौलात तर होत नाही ना याची तुमची दक्षता बाळगायला हवी. अती विश्वास, अभिमान, गर्व हे तुम्हाला बाधक ठरु शकतात. म्हणून पाय जमिनीवर ठेवा. एखाद्या कामात जोमाने सुरुवात करा.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. पण तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तरीही तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या कुठल्यातरी भौतिक, आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे. भरपूर कष्ट करा. वैयक्तिक गोष्टींत खूप वेळ अडकू नका. एखाद्या कामात कौशल्य मिळवा. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. स्वावलंबी व्हा. "एकला चलो रे" या गीतातील शब्द तुमच्या ध्यानात ठेवा.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी सगळ्यांसोबत देवाणघेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे जाणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात. आजूबाजूला समन्वय आणि समानता साधली जाईल. एखादे बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" प्रमाणे वागा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.