शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Tarot Card: सप्टेंबरचा पहिला आठवडा थोडा कष्टाचा, सबुरीने घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 10:41 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडून तुम्हाला तुमचे आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१ ते ७ सप्टेंबर===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोहोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्य सुधारेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्था पलीकडे जाऊन लोकसेवा करा.

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेले उत्तर किंवा प्रतिसाद मिळेल. एका अर्थी तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. तुम्ही करत असलेली प्रार्थना किंवा उपासना यांना बळ मिळेल. आश्वासक घटना घडेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही परिस्थितीला तोंड देताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमची साधना फलित होईल असा विश्वास ठेवा. याबरोबरच काम प्रामाणिकपणे करत रहा, तुमचा पूर्ण प्रयत्न करा. बदल घडत असतील तर ते स्वीकारा, ते तुमच्या हितासाठी घडत आहे असा विश्वास ठेवा. "सुरवंटाचेच फुलपाखरु होते" हे लक्षात ठेवा!

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. बरेच कष्ट करावे लागतील. कसलीतरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. इतरांकडून हीन वागणूक मिळू शकते. पण या सगळ्यातूनच "आजची रात्र ही उद्याच्या पहाटेची चाहूल घेऊन येते" याचा अनुभव तुम्हाला येईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतः संयम ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे व्यवहार टाळा. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा आहे त्यात तुम्ही तुमचं उत्तम कसं करू शकता याकडे लक्ष द्या. परोपकार  करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा. "पेराल तेच उगवेल" म्हणून आत्ता चांगलेच पेरा!

९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष