शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: 'लेट पण थेट' असा अनुभव देणारा आगामी आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 07:00 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या तीन कार्डपैकी एक कार्ड निवडून आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते.

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३० जून ते ६ जुलै===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पण तुमच्या कष्टाचे हवे तसे फळ मिळणार नाही. कुठेतरी काहीतरी अडकेल, विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल! आहात त्या परिस्थितीत आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. "मन प्रसन्न तर घर प्रसन्न" असा अनुभव येईल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विवेकबुद्धी, संयम आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. या सगळ्या भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा. तुम्ही करत असलेली उपासना सुरू ठेवा, सुंदर अनुभव येतील.

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येत आहे. तुमच्यासाठी नवीन असलेल्या किंवा तुम्हाला ज्याची जास्त माहिती नाही अशा कामासाठी किंवा जबाबदारीसाठी तुमची नेमणूक होऊ शकते. तुम्हाला अगदी पहिल्या पायरीवर असल्यासारखे वाटेल. नाविन्यपूर्ण गोष्टी शिकाल. नव्या संधी, नवीन उमेद, नवी दिशा मिळेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही अनुभवाचा आणि ज्ञानाचा चष्मा थोडा बाजूला करून आलेले काम अगदी नवख्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. नवीन काहीतरी शिका, नवीन लोकांशी मैत्री करा. स्वतःला काहीसं मोकळं सोडा म्हणजे तुम्ही तुमचं पूर्ण कौशल्य ओळखू आणि वापरू शकाल. "फिरुनी नवी जन्मेन मी" याप्रमाणे नवीन संधी स्वीकारा!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष