शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: आगामी आठवडा ठरेल आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम काळ; वाचा टॅरो कार्ड भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:24 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही आगामी सप्ताहाचे भविष्य जाणून घेऊ शकता. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन७ ते १३ जुलै===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी विश्रांती आणि मध्यांतराचा असणार आहे. खूप कष्ट करुन, बरेच अडथळे ओलांडून तुम्ही एका टप्प्यावर येऊन पोचल्याने आता तुम्हाला थोडा वेळ तरी आरामाची गरज वाटणार आहे. त्यामुळे कामे संथपणे होतील. अपेक्षित उत्तरं, अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. एका जागी थांबला आहात असं वाटेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला काम थोडं कमी करुन काही प्रमाणात विश्रांती घेण्याचा संदेश दिला जात आहे. आत्ता स्वतःला थोडं मागे ओढा, थोडा काढता पाय घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. धावाधाव थांबवा. शांतपणे काम करा. जमेल तेवढंच काम करा, दडपण घेऊ नका. वादविवाद आणि अतिवीचार पूर्णपणे टाळा. प्रकृतीकडे नीट लक्ष द्या.

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्याच्या सुधारेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्था पलीकडे जाऊन लोकसेवा करा.

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. संयम आणि धैर्याचा कस लागेल. काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. पण संयमाचे फळ शेवटी गोड मिळेल याची खात्री ठेवा.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. आर्थिक गुंतवणूक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.

श्रीस्वामी समर्थ.

संपर्क : ९५६१०९३७४०

टॅग्स :Astrologyफलज्योतिष