साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२१ ते २७ सप्टेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?हा सप्ताह तुम्हाला पेलायला थोडा अवघड असला तरी हताश होण्याचे कारण नाही. कारण यातूनच तुम्ही सुधारणा करु शकणार आहात. काही प्रमाणत दडपण येऊ शकते, पण निराश होऊ नका. कामामध्ये तुम्ही शेवटच्या टप्प्याजवळ तुमची परीक्षा होणार आहे. या नवरात्रीत तुम्ही मनाने भक्कम राहण्यासाठी दुर्गादेवीचे स्मरण करत रहा.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही खूप गोष्टी एका वेळी अंगावर घेऊ नका. अतिविचार करणे सोडा. परिस्थिती प्रतिकूल असताना मनाने खंबीर रहा. एकटे पडू नका. चार चौघात बोलून मोकळे व्हा. डोकं, डोळे, पाठ, कंबर यांची विशेष काळजी घ्या. गरज वाटत असेल तर विश्रांती घ्या. मनोबल घालवून बसण्यापेक्षा ही परिस्थिती देखील सुधारेल हा विश्वास ठेवा!
नंबर २: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांकची मुबलकता घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत चांगली घटना घडेल. या देवीच्या उत्सवात तुमच्यावर लक्ष्मीमातेची विशेष कृपा राहील!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा. स्वार्थ सोडून लोकहिताचा विचार करा!
नंबर ३: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी खोळंबलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. मनातून उत्साह आणि ऊर्जा कमी राहील. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत. या नवरात्रीत समाधान मिळण्यासाठी देवीची उपासना करा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.