साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२६ जानेवारी ते १ फेब्रुवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. एखादी तरी आनंदी घटना घडेल! तुम्हाला हवं असलेलं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे किंवा त्याबाबतीत सकारात्मक घटना घडतील. इतरांकडून मान सन्मान आणि सहकार्य मिळेल. लोकांना तुमचा सहवास आवडेल. "आज मैं उपर आस्मा नीचे", साधारण असा काळ आहे!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही उत्साहयुक्त राहण्याची गरज आहे. काहीही झालं तरी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. लढण्याची वृत्ती ठेवा पण कोणाशी विनाकारण भांडू नका. स्पर्धा जिंकण्यापेक्षा काम असं करा की तुम्ही इतरांचं मन जिंकाल. आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि खेळाडू वृत्ती ठेवा. चांगले नेतृत्व करा.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी आनंद आणि उमेद घेऊन येत आहे. सध्या सुरू असलेल्या त्रासातून थोडा दिलासा मिळणार आहे. जखमेवर फुंकर घालणारा हा काळ आहे. तुमच्या कृतीला वैश्विक शक्तीचे बळ मिळेल. तुम्ही जे कराल त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. "अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु" असा अनुभव येईल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही जे करत आहात तेच अधिक चांगल्या भावनेने करायचे आहे. श्रद्धेने तुमचे काम करा. चांगुलपणावर आणि विश्वाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. नीतीने आणि विवेकबुद्धी वागा. इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करा. अवघड परिस्थितीतही खचून जाऊ नका. स्वतः साठी वेळ काढा आणि जमेल ती उपासना करा.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. झटपट गोष्टी घडतील. तुमचे अडकलेले काम नक्कीच या काळात मार्गी लागणार अशी खूप शक्यता आहे. तुम्हाला कुठेतरी सारखी ये जा करावी लागू शकते. लगीनघाई असल्यासारखे वाटेल. चांगल्या कामासाठी धावपळ होईल. हवी असलेली बातमी येईल किंवा त्यासंबंधी काही माहिती कळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. तुमच्या कडून कोणताही उशीर करु नका. तुमचे संभाषण संवाद यांकडे लक्ष द्या. बर्याच घटना घडतील त्यामुळे उत्साह ठेवा आणि जमेल तितका तुमचा सक्रिय सहभाग ठेवा. काही कामांचा आपणहून पाठपुरावा करा. जितके कष्ट कराल तितके फळ हे निश्चित!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.