शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:22 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डापैकी एक कार्ड निवडून तुम्हाला तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१२ ते  १८ मे===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी अधिकाराचा आणि वर्चस्वाचा असणार आहे. तुम्ही करत असलेले काम मोठे होईल. विस्तार होईल. तुम्हाला एक महत्त्वाचा टप्पा गाठता येईल. बऱ्याच गोष्टींची सूत्रे तुमच्या हातात असतील. त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे. वडील किंवा मोठ्या आदरणीय व्यक्तींचा दबदबा राहील.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला स्वतः राजा आणि बाकीचे प्रजा अशी भावना येऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. पण याचे रुपांतर पोकळ डौलात तर होत नाही ना याची तुमची दक्षता बाळगायला हवी. अती विश्वास, अभिमान, गर्व हे तुम्हाला बाधक ठरु शकतात. म्हणून पाय जमिनीवर ठेवा. सामर्थ्यवान अशी सप्ताहाची सुरुवात करा.

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा.

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी स्थैर्य आणि दिलासा घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या कामात संथ पण सबळ वाटचाल करणार आहात. काही अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात पण त्यातून तुम्ही आणखी मजबूत आणि सक्षम होणार आहात. प्रवास घडू शकतात. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. पण फळ मात्र सावकाश मिळेल म्हणून संयम ठेवा!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही कृतिशील राहण्याची गरज आहे.  तुमच्या कामात खूप कष्ट करा.  जीव ओतून प्रामाणिक प्रयत्न करा.  घाई न करता कोणतेही काम अधिक चांगले आणि परिपूर्ण कसे करता येईल याकडे लक्ष द्या. चिकाटीने काम केले तर उत्तम प्रगती होऊ शकेल. विश्वासाच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकता.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष