शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: आनंददायी आठवडा, कष्ट करा, ध्येयावर लक्ष ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:05 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडून किंवा राशीनुसार तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य जाणून घेऊ शकता.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

नंबर १: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा कठीण असणार आहे. तुम्हाला तुमच्या जागेवर पाय घट्ट रोवून उभं रहावं लागेल. काही लोक, काही स्पर्धक तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकाल. या प्रतिकूल परिस्थितीवर तुमच्या जिद्दीने नक्कीच यश मिळवू शकता.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची, तुमचं सर्वोत्तम देण्याची गरज आहे. काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाका. घाबरण्याची गरज नाही. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ताकद आहे ज्याने तुम्हाला ही परिस्थिती जिंकता येईल, हा विश्वास ठेवा.

नंबर २: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एकंदरीत आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादे लहान ध्येय पूर्ण होईल. कलेतून किंवा छंदातून आनंद मिळेल. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. संबंध सुधारतील. एकत्र येऊन एखादे कार्य पूर्ण कराल. केलेल्या कष्टाचे चीज होईल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. कुटुंबाला वेळ नक्की द्या. ध्यान उपासना करा!

नंबर ३: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. पण तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तरीही तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या कुठल्यातरी भौतिक, आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे. भरपूर कष्ट करा. वैयक्तिक गोष्टींत खूप वेळ अडकू नका. एखाद्या कामात कौशल्य मिळवा. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. स्वावलंबी व्हा. "एकला चलो रे" या गीतातील शब्द तुमच्या ध्यानात ठेवा.

संपर्क : sumedhranade90@gmail.com

श्रीस्वामी समर्थ.

English
हिंदी सारांश
Web Title : Tarot Card Weekly Prediction: Focus on Goals, Work Hard, Be Happy

Web Summary : This week's tarot reading advises perseverance, joy through hobbies, and focused effort. Overcome challenges, nurture relationships, and stay dedicated to your goals for success and satisfaction.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य