शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

Tarot Card: नवीन वर्षाची आनंददायी सुरुवात, फक्त संयम ठेवा मनात; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:05 IST

Tarot Card:टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुमचे साप्ताहिक भविष्य पाहू शकता. 

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३० मार्च ते ५ एप्रिल===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी वैचारिक गुंतागुंतीचा असणार आहे. अनेकविध विचारांनी मनावर परिणाम होऊ शकतो. निर्णय घेणं अवघड वाटू शकतं. तुम्ही ठरवलेल्या कामात किंवा तुम्ही आखलेल्या नियोजनात फार गती येणार नाही. गोष्टी हव्या तशा पुढे सरकणार नाहीत. अकारण विलंब होऊ शकतो पण हाच वेळ तुमच्या आत्मोन्नती साठी योग्य ठरेल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही शांत बसून, तोलून मापून विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. निर्णय घेताना बुद्धीने, सारासार विचार करून घ्या. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन काहीही करू नका. एकाग्रपणे काम करा. इतरांच्या सोबतीपेक्षा एकट्याने काम करा. नूतन वर्षाची सुरुवात ध्यान आणि उपासनेने केली तर उत्तम परिणाम मिळतील!

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. या गुढी पाडव्याला कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ती कटुता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी मागे केलेल्या कामाचे चांगले फळ घेऊन येत आहे. तुमच्या कष्टाचं चीज होईल. लोकांकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असलेलं नाव, हुद्दा, मान सन्मान, बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द हे या सप्ताहात मिळू शकतात. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल, काही प्रश्न सुटतील.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. हुरळून जाऊ नका. लोकांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुमच्या संघातील सगळ्यांना आधार द्या. एक आदर्श नेतृत्व करा. काही लोक तुमचा दुस्वास करू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चाला. या पाडव्याला इतरांना निःस्वार्थ निरपेक्ष मदत करण्याची गुढी उभारा!

संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाAstrologyफलज्योतिष