साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२३ ते २९ नोव्हेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी- मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी चढाओढीचा असणार आहे. किरकोळ वादविवाद किंवा भांडणं होऊ शकतात. एखादी परीक्षा द्यायची वेळ येईल. अपेक्षित यश गाठण्यासाठी अडथळे येऊ शकतात. काही लोकांमुळे हातची संधी जाऊ शकते. नोकरी व्यवसायात तुमच्या मताला किंमत मिळण्यासाठी तुम्हाला बरीच धडपड करावी लागेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात इतरांवर पटकन विश्वास ठेवू नका. लोकांना काहीतरी पटवून देण्यापेक्षा त्यांना ते आपोआप पटेल असं करुन दाखवा. स्पर्धा आहे ती स्वीकारा आणि त्यात तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा. तुम्ही मागे राहून किंवा हातपाय गाळून चालणार नाही, आलेल्या परिस्थितीशी दोन हात करा!
नंबर २: (राशी- वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी परीक्षेचा असणार आहे. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. कामे रखडली जातील. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. येणार्या पहाटेसाठी आजची रात्र गरजेचीच असते हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. कोणतेही नियम मोडू नका. जोखीम उचलू नका. व्यसनात गुंतू नका. अती तिथे माती हे लक्षात ठेवा! हा काळ तुम्हाला आत्मसंयम ठेवायला सांगतो आहे!
नंबर ३: (राशी- मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुम्हाला बुद्धीचातुर्य दाखवण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्वाचे संवाद घडतील. कडक वागावं लागेल, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा नियम आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. कामामध्ये नियोजनाचा, आराखडा तयार करण्याचा एक टप्पा गाठला जाईल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. पक्षपात करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. स्पष्ट संवाद ठेवा. लोकप्रिय नको, न्यायप्रिय आणि नीतीप्रिय वागा.
संपर्क : sumedhranade90@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.
Web Summary : This week's tarot reading advises against greed and emphasizes listening to your intuition. It highlights potential challenges and encourages resilience, self-control, clear communication, and ethical decision-making across different zodiac signs.
Web Summary : इस सप्ताह का टैरो राशिफल लालच से बचने और अपनी अंतरात्मा की सुनने पर जोर देता है। यह संभावित चुनौतियों पर प्रकाश डालता है और विभिन्न राशियों के लिए लचीलापन, आत्म-नियंत्रण, स्पष्ट संचार और नैतिक निर्णय लेने को प्रोत्साहित करता है।