साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२१ ते २७ डिसेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी : वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. बरेच कष्ट करावे लागतील. कसलीतरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. इतरांकडून हीन वागणूक मिळू शकते. पण या सगळ्यातूनच "आजची रात्र ही उद्याच्या पहाटेची चाहूल घेऊन येते" याचा अनुभव तुम्हाला येईल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतः संयम ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे व्यवहार टाळा. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा आहे त्यात तुम्ही तुमचं उत्तम कसं करू शकता याकडे लक्ष द्या. परोपकार करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा. "पेराल तेच उगवेल" म्हणून आत्ता चांगलेच पेरा!
नंबर २: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एक पर्याय निवडीचा आणि त्यावर ठाम राहण्याचा असणार आहे. तुम्हाला दिलेलं काम पार पाडण्यात तुमचा कस लागेल. केलेल्या कष्टांना काही प्रमाणात यश मिळेल. इतरांकडून मदतीचा हात मिळेल. प्रतिसाद चांगला मिळेल. कोणत्याही नात्यात दुरावा आला असेल तर त्यात चांगली सुधारणा होऊ शकते.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही एका व्यक्तीला, किंवा एका कामाला, किंवा एकाच गोष्टीला तुमचा पूर्ण वेळ देण्याची गरज आहे. एकाच वेळी अनेक कामे हाताळू नका. कामामध्ये चिकाटी आणि धैर्य ठेवा. दिलेला शब्द पूर्ण करा, त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा. इतरांना सोबत घेऊन पुढे चाला. एकोप्याने आणि चांगल्या भावनेने वागा.
नंबर ३: (राशी : मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम आणि शंका निर्माण करणारा ठरु शकतो. तुमचा स्वतः वरचा विश्वास कमी होऊ शकतो. इतरांनी तुमच्या डोक्यात काहीतरी घातले तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली राहाल अशी शक्यता दिसते आहे. पण स्वतःला मजबूत ठेवले, मन भक्कम ठेवले तर हा सप्ताह तुमच्यातील कलेला, सृजशीलतेला वाव देणारा ठरेल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनाप्रमाणे वागता वागता तुम्ही वाहवत तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. इतरांचे बोलणे किती ऐकायचे हे तुम्ही ठरवा. ध्यान मेडीटेशन प्रार्थना करा. पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. "मन करा रे प्रसन्न" तुकोबांच्या अभंगाप्रमाणे तुम्ही मन आनंदी ठेवले तर हा काळ आनंदी!
श्रीस्वामी समर्थ.
Web Summary : This week's tarot reading advises patience, perseverance, and listening to your inner voice. Focus on what you have, avoid major investments, and help others. Navigate choices wisely, be persistent, and maintain faith in yourself amidst potential confusion.
Web Summary : इस सप्ताह का टैरो रीडिंग धैर्य, दृढ़ता और अपनी आंतरिक आवाज सुनने की सलाह देता है। आपके पास जो है उस पर ध्यान केंद्रित करें, बड़े निवेश से बचें और दूसरों की मदद करें। बुद्धिमानी से विकल्प चुनें, लगातार बने रहें और संभावित भ्रम के बीच खुद पर विश्वास बनाए रखें।