साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१८ ते २४ मे===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
जरी असेल प्रतिकूल काळ, मनाने रहा अढळ सबळ,सरेल रात्रीची अवघड वेळ, विश्वास ठेवा होईल सकाळ!
नंबर १:
काय घडू शकते?आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी एक अवघड वळण घेऊन येत आहे. तुमचे कष्ट या काळात कमी प्रमाणात फलित होतील म्हणून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या चांगल्या. वास्तविक परिस्थिती पेक्षा तुमची मानसिक स्थिती कशी आहे यावर तुमचा हा काळ अवलंबून राहील. म्हणून "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाला येईल तसे वागायला जाऊ नका कारण त्यात तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही प्रसंगात कोणाचा तरी आधार घेऊन, सल्ला घेऊन पुढे चाला. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काही उत्तम आहे, काय चांगले आहे याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा, यश नक्कीच येईल!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला थोडा अवघड असला तरी हताश होण्याचे कारण नाही. कारण यातूनच तुम्ही सुधारणा करु शकणार आहात. काही प्रमाणत ताण किंवा दडपण येऊ शकते, पण निराश होऊ नका. कामामध्ये तुम्ही शेवटच्या टप्प्याजवळ तुमची परीक्षा होणार आहे. मनाने भक्कम राहून पुढची वाटचाल केली तर काही प्रमाणात यश मिळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही खूप गोष्टी एका वेळी अंगावर घेऊ नका. अतिविचार करणे सोडा. परिस्थिती प्रतिकूल असताना मनाने खंबीर रहा. एकटे पडू नका. चार चौघात बोलून मोकळे व्हा. डोके, डोळे, पाठ, कंबर यांची विशेष काळजी घ्या. गरज वाटत असेल तर विश्रांती घ्या. मनोबल घालवून बसण्यापेक्षा ही परिस्थिती देखील सुधारेल हा विश्वास ठेवा!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. पुढची वाट मोकळी होईल. एखादी हवी असलेली गोष्ट तुम्ही प्राप्त कराल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा. या काळात एकटेपणाचे विचार घालवून एकोप्याने वागा!
९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.