शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Swapna Shastra: स्वप्नात स्वतःला 'विवस्त्र' स्थितीत पाहणे, हे नेमके कशाचे लक्षण आहे?; स्वप्नशास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:48 IST

Swapna Shastra: अनेकदा अशी काही विचित्र स्वप्न पडतात, की दचकून जाग येते आणि ते स्वप्न होते या विचाराने हायसे वाटते, पण त्यामागे कारण काय? वाचा!

स्वप्न म्हणजे काय? तर दिवसभर मनात घोळणाऱ्या विचारांचा चलपट. विचार कोणते तर सगळ्या प्रकारचे. जे विचारांच्या पलीकडे आहे त्यांचेही विचार मनात घोळतात आणि अशा गोष्टी स्वप्नात दिसतात. न पाहिलेले स्थान दिसते, न पाहिलेल्या व्यक्ती दिसतात, कधीतरी प्रत्यक्षात पाहताना या गोष्टी आधीच पाहिल्याचा भास होतो. अशी ही स्वप्नांची अजब गजब आणि गूढ दुनिया आहे. स्वप्नशास्त्रात त्याचा सखोल अभ्यास केला जातो. त्यात वेगवेगळ्या स्वप्नांमागे असलेली कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जातो तसेच भाकीतही वर्तवले जाते. चांगले वाईट स्वप्न पडण्यामागे भविष्यातील घटनांचाही वेध घेतला जातो. अशातच एक विचित्र आणि घाम फोडणारे (Scary Dreams) स्वप्न म्हणजे स्वतःलाच विवस्त्र दशेत पाहणे... 

मनुष्य पैसे, नाती याबरोबरीने जपतो ते आपल्या इब्रतिला! लोक काय म्हणतील हा विचार आपल्या मनात इतका खोलवर रुतलेला असतो, की त्यामुळे विचार करण्याची पराकाष्टा होते. समाजात वावरताना आपण सभ्यपणे वावरतो. चारचौघात कोणी बोलले तर ओशाळतो. फजिती होईल या भीतीने पाऊल पुढे टाकायला घाबरतो. हे सगळे विचार मंथन डोक्यात सुरु असताना, मध्येच कधीतरी विचित्र स्वप्न पडते, दरदरून घाम फुटतो, जाग येते आणि ते स्वप्न होते या विचाराने आपण पाण्याचा घोट घेत शांत होतो. असेच एक घाबरवणारे स्वप्न म्हणजे विवस्त्र दशा! (Seeing yourself naked in dream)

आपण चारचौघात वावरतोय पण शरीरावर लज्जा रक्षणापुरताही कपडा नाही; आपण बाहेर निघालो आहोत पण कपडेच घालायला विसरलो, आपण अंघोळ करतोय तेवढ्यात कोणी आले आणि आपण उघडे पडलो आहोत अशी विवस्त्र दशेची स्वप्नं मनात दहशत निर्माण करतात. त्यामागे काय कारण असू शकते ते स्वप्नशास्त्र जाणणाऱ्या तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. 

स्वप्न शास्त्राचे जाणकार सांगतात, 'स्वप्न ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सांगायचे, तर असे स्वप्न पाहणारे लोक येत्या काळात कंगाल होणार याची ही लक्षणे आहेत किंवा आर्थिक समस्या निर्माण होण्याचेही ते चिन्ह आहे असे समजावे. अशा वेळी स्वतःचा बँक बॅलेन्स स्वकष्टाणे वाढवण्यावर लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात अडचणी असतील तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन आर्थिक प्रश्न मिटवण्यावर भर द्यावा. मन शांत स्थिर होईपर्यंत नवीन नोकरी, व्यवसायाचा निर्णय घेणे टाळावे. 

मानसतज्ञ सांगतात - 

असे स्वप्न पडण्याचे मुख्य कारण म्हणजे विचारांची, मनाची अस्थिरता. जर मन शांत नसेल, मनावर एखाद्या विषयाचे दडपण असेल तर चारचौघात अब्रू गेल्याही स्वप्ने दिसू लागतात. विवस्त्र स्थितीत आहोत असे जाणवते आणि स्वप्नात नाही तर सत्यात आपली फजिती होत आहे या विचाराने घाबरून जाग येते. अशा वेळी मन शांत करणे गरजेचे आहे. झोपण्याआधी दहा मिनिटे ओंकार जप करा. इष्ट देवतांचे स्मरण करा. एखादे स्तोत्र पाठ असेल तर ते म्हणा. गरम दूध प्या. असे केल्याने शांत झोप लागेल. 

हेही असू शकते कारण -

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, 'जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात एखाद्या परिस्थितीची भीती वाटते, एखाद्या गोष्टीची काळजी लागून राहते, तेव्हा बऱ्याचदा अशी स्वप्न पडतात. मनावर असलेला ताण बेअब्रू होण्याची भीती निर्माण करतो. आपण खोटे पडू, उघड पडू, फजिती होईल, पुढे काय होणार याचा अतिविचार अशा स्वप्नाना कारणीभूत ठरतो. 

त्यामुळे अशी स्वप्न दिसली म्हणून घाबरू नका, सावध व्हा, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, व्यायाम करा, मनावर आणि शरीरावर आलेले दडपण घालवा. वाईटात वाईट काय घडेल याची कल्पना करा आणि त्या स्थितीवर मात करण्यासाठी मनाला आधीच खंबीर बनवा. जेणेकरून स्वप्नातही अशी फजिती होण्याची काळजी लागून राहणार नाही आणि शांत झोप लागेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष