शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samartha:स्वामींच्या चरणी लीन होताना उपासनेची 'ही' आयुधे ठरतील जीवनाचे वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:03 IST

Swami Samartha: रोजच्या दिनचर्येत उपासनेसाठी कोणती वेळ ठरवावी, कोणती उपासना करावी आणि संकटकाळी कोणता मार्ग लाभदायी ठरतो ते जाणून घ्या. 

>> अस्मिता दीक्षित

आपल्या परंपरा आणि संस्कृती उपासनेची विविध दालने खुली करतात. जन्मल्यापासून आपली आई विविध प्रार्थना, स्तोत्रे यांतून आपल्याला उपासनेचे बाळकडू पाजत असते. पण मोठे झाल्यावर आपल्याला शिंगे फुटतात आणि “वेळ नाही” या गोंडस नावाखाली आपली उपासना, मंत्रजप कमी होत जातो.

संकष्ट चतुर्थी २०२६: देवाची खास माणसं! बाप्पाची सावली सदैव ज्यांच्या पाठीशी असते, अशा ६ राशी!

उपासना आपल्याला आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेने बघायला शिकवते. आनंद देणारी ही उपासना जीवनाची नुसती मूल्ये शिकवत नाही, तर आपल्या जन्माचे रहस्य सुद्धा उलगडून दाखवते. उपासना अपरिहार्य आहे. रोजच्या जीवनातील नित्य व्यवहार आपण कसे करतो, त्याला उपासनेची जोड असेल, तर जीवनात कितीही चढ-उतार आले तरी मनस्वास्थ्य बिघडणार नाही आणि मनाला उभारी मिळेल. आपले कुलदैवत, इतर देवता आणि इष्टदेवता यांचे नित्य स्मरण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असला पाहिजे. आपल्या कुलदेवतांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.

कुठल्याही उपासनेत जीव ओतावा लागतो, त्याशिवाय फळाची अपेक्षा व्यर्थ आहे. त्यात एकरूपता येणे गरजेचे आहे. आपण करत असलेल्या उपासना शिस्तबद्ध असल्या पाहिजेत. शक्यतो काळ, वेळ आणि ठिकाण तेच असावे.

नित्य उपासना आपल्या पूर्वजांपासून घरात होत असते, त्याचे संस्कार कळत-नकळत आपल्यावर सुद्धा होत असतात; ते आत्मसात करणे मात्र आपल्यावर आहे. सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य देणे आणि गायत्री मंत्र म्हणणे, बुद्धीचा दाता श्री गणेश याचे गणपती स्तोत्र, आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण, दत्त किंवा स्वामींचा जप—आपण नेहमी करत असलेला सद्गुरूंचा जप या गोष्टी नित्य करायच्या आहेत.

६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील!

त्यासाठी "वेळ नाही" ही सबब बालिश आहे. यांच्यासाठी वेळ नसेल तर मग कोणासाठी आहे? हा प्रश्न स्वतःलाच विचारलेला बरा. सोशल मीडिया सकाळी सकाळी हवाच कशाला? विचार करा. संध्याकाळी हातपाय धुवून शुभंकरोती, रामरक्षा, हनुमान चालिसा म्हणायचीच; त्याशिवाय जेवायचे नाही, हे एकदा ठरवले की ते होणारच. पण आपण ठरवतच नाही.

यातील काहीच करायचे नाही जे सहज करण्यासारखे आहे, मग प्रश्न आला की हा ज्योतिषी, तो ज्योतिषी, कर्मकांड सुरू होते. ही शांती, ती शांती असे सुरू होते. स्वामींचे नाव घेतले आणि त्यांचे चरण धरले की इतर कोणाचेही काहीही करण्याची आवश्यकता नाही. जे कराल ते भक्तीने, मनापासून आणि असीम प्रेमाने करा. जे आपल्या मुलावर प्रेम आहे, तेच महाराजांवर असेल तर आयुष्यातील प्रश्न सुटायला मदत होईल.

उपासनेत सातत्य हवे. दिवसातून आपण चार-चार वेळा जेवतो, तसे एकदा मनापासून नाम घेऊन तर बघा. अडचणीच्या वेळी ते अनंत हातांनी पाठीशी उभे राहतील. रोजच्या जीवनात दानधर्माला पण महत्त्व आहे. समाजाचे ऋण आहे की नाही आपल्यावर? आता उन्हाळा आला आहे, तर थंड पाण्याची बाटली गरजू व्यक्तीला द्या. चपला, चादर, पुस्तके, वह्या किंवा औषधांसाठी पैसे द्या. किती काही करण्यासारखे आहे! थोडे करा, पण नक्की करा.

उपासनेची इतकी उत्तम आयुधे आपल्याकडे असताना आपण हतबल होण्याचे मुळात कारण नाही. उपासना आपले मन खंबीर बनवते, मार्ग आपोआप मिळत जातात; पण ते श्रद्धेने आणि मनापासून केले तरच. यामुळे आंतरिक शक्ती जागृत होते, देवतेवरील विश्वास दृढ होतो.

Vastu Tips: प्रत्येकाच्या घरात गणेश मूर्ती असतेच, पण ती चुकीच्या दिशेला तर ठेवली नाही ना? आजच तपासून बघा!

आज अध्यात्म आपण गरजेपुरते वापरतो. संकट आले की चला देवळात! पण आधीच का जात नाही? आणि संकट गेले की त्या देवतेला विसरायचे, असे होऊन चालणार नाही. देवता सुद्धा परीक्षा घेतात; कधी कठोर तर कधी सौम्य. त्यांना ठरू दे आपल्याला फळ कधी द्यायचे ते, कारण ते आपल्या कर्माशी निगडित आहे. उपासना करून जणू आपण देवतेशी व्यवहार करू पाहतो, किंबहुना तिच्यावर हक्क गाजवू लागतो. "मी आता इतक्या वेळा श्रीसूक्त म्हटले म्हणजे माझे हे काम १६ दिवसांत व्हायला हवे," किंवा "तारकमंत्र म्हटला आता स्वामी माझे काम करतीलच," हा भ्रम आहे. आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी उपासना आणि मंत्रसाधना आहेत. प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेतच होणार, हे विधिलिखित आहे. उपासना करून आपण आपले संयमबळ वाढवत असतो.

इतक्या उपासना करतो, पण आपल्याला आपल्या कुलस्वामी, देवता किंवा सद्गुरूंच्या बद्दल नेमके काय माहित असते? कधी त्यांच्याबद्दल सखोल चिंतन किंवा त्यांच्या अवतारकार्याचा अभ्यास आपण केलाय का? नुसते मंत्र घ्यायचे आणि त्याचा कीस पाडायचा! लक्ष कशातच नसते, नुसते शरीराने मंत्र म्हणायचे आणि मनाचे समाधान करून घ्यायचे. जेव्हा मंत्रात एकरूपता येते, तेव्हा तो किती वेळा म्हटला याचा विसर पडतो आणि जेव्हा आपण सगळे विसरतो, तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला महाराज किंवा ज्या देवतेचे स्मरण करतो तीच दिसते. मग आपले काम कधी होणार याचाही विसर पडतो आणि ध्यास लागतो तो केवळ नामस्मरणाचा.

संकष्ट चतुर्थी २०२६: बाप्पाची कृपा आणि संकटांचा अंत! हिंदू वर्ष संपण्यापूर्वी 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो

उपासना जीवन बदलते, आपले आचार-विचार शुद्ध करते. "तो असा वागला, मग मी पण असाच वागणार" ही वृत्ती कमी होते. आराध्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न प्रत्येक भक्ताने करावा.

उपासना हेच आयुष्याचे खरे मर्म आणि जीवनाचा उद्देश आहे. ज्याला हे समजले, त्याचे जीवन सुकर होणार यात दुमत नसावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Samartha: Surrendering at His Feet, Worship Tools as Life's Boon!

Web Summary : Embrace daily worship for mental peace and self-discovery. Remember deities, cultivate discipline in practice, and donate to society. Consistent devotion strengthens faith and transforms life, guiding you through challenges.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीspiritualअध्यात्मिक