शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Suraya Grahan 2022 : सूर्यग्रहण, त्यात शनी अमावस्या; विशेषतः स्त्रियांसाठी प्रभावी ठरेल 'हा' मंत्रजप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 14:14 IST

Surya Grahan 2022 : ३० एप्रिल रोजी या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत ईशचिंतन करा असे पूर्वापार सांगितले जाते. 

'ग्रहण' या शब्दात एवढी नकारात्मकता भरली आहे, की आपण एखादे होणारे काम होत नसले तर `काय ग्रहण लागले आहे', असे म्हणतो. या नकारात्मकतेतून ग्रहणाची तीव्रता लक्षात येते. ग्रहण ही भौगोलिक अवस्था आपल्या मानसिक अवस्थेवर तीव्रतेने परिणाम करते. यासाठीच ग्रहणकाळात देवाचे नाव घ्या असे सांगितले जाते. त्यात शनी अमावस्या असल्यामुळे 'ओम शनैश्चराय नमः' हा मंत्र देखील करता येईल. 

३० एप्रिल रोजी या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण आहे. ते भारतातून दिसणार नाही, तरीदेखील ग्रहणकाळाचा प्रभाव मात्र समस्त सजीव सृष्टीवर परिणामकारक ठरतो. म्हणून या कालावधीत ईशचिंतन करा असे पूर्वापार सांगितले जाते. 

सूर्य-चंद्र ग्रहणात गायत्री मंत्र करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसूक्त, रुद्र, नवग्रहांचे मंत्र तसेच अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. ग्रहणकाळात शक्यतेवढे नाम:स्मरण करावे.

स्त्रियांनी स्तोत्र पठण जसे की, महिम्न, व्यंकटेशस्त्रोत्र, विष्णु सहस्त्रनाम, गणेश-देवी सहस्त्रनाम तसेच नामजप करावा. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून जप करावा. जसे की, श्रीराम जय राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय. इ. नाम घेत असताना आसन घ्यावे. पलंगावर बसू नये. लोळत पडू नये. आपली नित्यकर्म करत प्रभूचे नाम स्मरावे. 

सूर्य हा पृथ्वीवरून दिसणारा एकमेव देव आहे. त्याला राहू व केतूच्या जाचातून मुक्त होईपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करावी. एकदा का ग्रहण सुटले, की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र, शिधा गरजूंना दान करावा. 

हे नियम आपल्या पूर्वजांनी पूर्वापार पाळले आहेत. आपणही यथाशक्ती सहयोग देऊन ईशकार्यात सहभाग घ्यावा आणि ग्रहणकाळ आपल्या नित्यकर्माबरोबरच परमेश्वर चिंतनात घालवावा.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण