शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Sun Transit 2022 : आजपासून महिनाभर 'या' राशींना सहन करावा लागेल सूर्याचा 'ताप'; होत आहे सूर्याचे स्थित्यंतर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 12:52 IST

Sun Transit 2022: सूर्याच्या स्थित्यंतरामुळे बारा राशींवर परिणाम होणार आहे, तुमच्या राशीला चांगला परिणाम येणार आहे की वाईट ते जाणून घ्या!

आज फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि दुपारनंतर त्रयोदशी ही तिथी सुरू होत आहे. त्याचबरोबर बदलणाऱ्या ग्रहस्थितीमुळे आज सूर्याने कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केला आहे. सूर्याचे हे स्थित्यंतर १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. या काळात सूर्य मीन राशीत राहील. तसेच आज भौम प्रदोष व्रत देखील आहे. या संपूर्ण ग्रहस्थितीचा परिणाम बाराही राशींवर कशाप्रकरे होणार आहे ते जाणून घेऊ. 

मेष : या काळात तुम्हाला निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आळस वाढू शकतो. नोकरी-व्यवसायातील धावपळ वाढू शकते. हाडे आणि सांधे समस्या असू शकतात. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा. शत्रू गोंधळून जातील. पैशाशी संबंधित कामात यश मिळेल.

वृषभ : वृषभ राशीतील सूर्य शुभ परिणाम देईल. तुम्ही उर्जेने परिपूर्ण रहाल, आर्थिक बाजू मजबूत असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती देणारा काळ असेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. शेअर बाजारात सकारात्मक लाभ होतील. मुलांच्या आयुष्यात किरकोळ समस्या येतील. डोळ्यांशी संबंधित विकार होऊ शकतात.

मिथुन : इच्छाशक्ती वाढेल. उपजीविकेची साधने वाढतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवस्थापन संबंधित कामे होतील. मोठे निर्णय घेऊ शकता. मानसिक समस्या वाढू शकतात, मुलांचे पालकांशी मतभेद होऊ शकतात.

कर्क : भाग्य तुम्हाला साथ देईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. नोकरीत बदलीची शक्यता आहे. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. अध्यात्माची आवड वाढेल आणि सत्कार्यात भाग घ्याल. 

सिंह : मनात अनिश्चिततेची भावना राहील. आकस्मिक निर्णय घेऊ नका. संशोधनाशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होईल. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. जिभेवर नियंत्रण ठेवा. शेअर बाजारात हुशारीने प्रवेश करा.

कन्या : सूर्याच्या राशी बदलामुळे घरगुती जीवनात त्रास होईल, छोट्या-छोट्या गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. पण आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रगती होऊ शकते. नोकरीत बदलाची परिस्थिती येऊ शकते.

तूळ : आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतील. हाडे आणि सांध्याची दुखणी ओढवतील. नोकरीत तणाव राहील. बिझनेसमध्ये कोणाच्या तरी फसवणुकीमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. घरगुती जीवनात किरकोळ वाद होऊ शकतात.

वृश्चिक : तुम्ही खूप उत्साही राहाल. तुमची कामाची क्षमता वाढेल. कामात फायदा होईल. काही मोठे बदल घडू शकतात. स्थान बदलणे देखील फायद्याचे ठरू शकते. शेअर बाजारात तुम्हाला फायदा होईल. मुलांची काळजी वाढेल. डोळ्यांचे विकार होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 

धनु : अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होऊ शकतात. नियमित ध्यान योग करा. आईशी संबंध बिघडू शकतात, वादात पडू नका.

मकर : भाग्य तुम्हाला साथ देईल. लोकांकडून कौतुक होईल. आध्यात्मिक ध्यानात रुची वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. छोटा प्रवास होऊ शकतो. पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.

कुंभ : कामात नवीन ऊर्जा जाणवेल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नाती दुरावण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवा. नोकरीत मन भरकटू शकते. अचानक संकट येऊ शकते. मन शांत ठेवा, मार्ग निघेल. 

मीन : नोकरी आणि व्यवसायात सकारात्मकता राहील. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही उत्साही असाल. शिस्त मोडू देऊ नका. तुम्ही एकांतात राहणे पसंत कराल. तुमच्या मुलांशी संबंधित चिंता दूर होतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष