शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यामागे महान भारतीय ऋषींची अशी होती दूरदृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 12:42 IST

ज्या ईश्वराने जीव निर्माण केला, तो ईश्वर कोणत्याही जीवाचा बळी मागणार नाही, हा साधा विचार मानव आपल्या सद्सदविवेकबुद्धीने करत नाही, हे दुर्दैव!

देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी कार्यसिद्धी झाल्यावर देवाप्रती ऋणनिर्देश म्हणून देवासमोर  मनुष्य किंवा पशूचा बळी दिला जात असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. त्यांनी विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ याचे बलिदान लोकांना सुचवले. कारण नाराळालाही डोके, शेंडी, नाक, डोळे आहेत. 

परंतु बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकावा झाला पाहिजे. म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला कुंकू लावायला व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले. त्यामुळे रक्ताचा लाल रंग येईल. अशाप्रकारे ऋषींनी मानवाला नर आणि पशूहत्येपासून वाचवले. शिवाय नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीर्घकाळ टिकणारे फळ आहे. 

तरीदेखील आजही अनेक ठिकाणी पशूबळी देऊन धार्मिकतेला हिंसक वळण दिले जाते. ज्या ईश्वराने जीव निर्माण केला, तो ईश्वर कोणत्याही जीवाचा बळी मागणार नाही, हा साधा विचार मानव आपल्या सद्सदविवेकबुद्धीने करत नाही, हे दुर्दैव!

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना `श्रीफळ' म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.