शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोष्ट सिंहाच्या केसाची व एका ताविजची; जी तुमचे मनोधैर्य नक्की वाढवेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 08:00 IST

आपणही आपल्या नावडत्या व्यक्तीला प्रेमाने जिंकू शकतो. म्हणून सर्वांवर नि:स्वार्थपणे प्रेम करत राहा, जगा आणि जगू द्या!

एका गावात एक फकीर होते. गावकरी त्यांना खूप मानत असत. त्या गावात एक महिला नवऱ्याच्या जाचाला कंटाळली होती. ती एकदा फकीराकडे गेली आणि म्हणाली, `बाबाजी, काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून माझा नवरा माझा गुलाम बनेल.' अशी विचित्र मागणी ऐकून फकीर म्हणाले, `मी तुला एक ताविज देतो पण त्याला जोवर सिंहाचा केस गुंडाळणार नाही, तोवर ते प्रभावी बनणार नाही.'

हे ऐकून मागचा पुढचा विचार न करता ती बाई म्हणते, `काही हरकत नाही बाबाजी, मी आणेन सिंहाचा केस फक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला माझा गुलाम बनवा.'

असे म्हणून बाई निघून गेली. गावाच्या जवळच एक जंगल होते. तिथे एक सिंह येत असल्याचे बाईने ऐकले होते. त्याची भूकेची वेळ सरून गेल्यावर बाईने तिथे जायचे ठरवले. रोज ती त्या वेळेत जाऊ लागली. पोट भरलेल्या अवस्थेत सिंह तिच्याकडे बघत निघून जात असे. असे करत तिने एक दोन नाही, तर सहा महिने जंगलात जाण्याचा सपाटा लावला. सिंहाला तिचा चेहरा परिचित झाला. ती आपल्याला काही करणार नाही याची खात्री पटली. हळू हळू त्यांची मैत्री झाली आणि ती बाई चक्क सिंहाला गोंजारू लागली. अशात एक दिवस ती कात्री घेऊन गेली आणि तिने सिंहाचा एक केस कापून आणला. 

दुसऱ्या दिवशी फकिरांकडे जात तिने तो सिंहाचा केस दाखवला व म्हणाली, `द्या आता मला ते ताविज!'

हे ऐकून  चाट पडलेले फकीर बाबा तिला म्हणाले, `बाई सिंहाला काबीज करणारी तू, तुला ताविजची काय गरज? एका हिंस्त्र प्राण्याला लाडीगोडीने तू माणसाळलेल्या अवस्थेत आणू शकतेस तर नवऱ्याला काय घाबरते? कधी प्रेमाने, कधी लाडी गोडीने, कधी धाक दपटशा दाखवून त्यालाही असेच वश करून घे. सुखी संसाराचे मर्म हेच सांगते, की नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवले तर संसार सुखाचा होतो. नवऱ्याला गुलाम बनवून गुलामाची बायको म्हणवण्यापेक्षा त्याला राजा बनवून राजाची राणी बनून राहा. रागाने काहीच साध्य होत नाही, तर प्रेमानेच मन जिंकता येते. हेच मार्मिक विचाराचे ताविज घेऊन जा, तुझे नक्की भले होईल बघ!'

या गोष्टीप्रमाणे आपणही आपल्या नावडत्या व्यक्तीला प्रेमाने जिंकू शकतो. म्हणून सर्वांवर नि:स्वार्थपणे प्रेम करत राहा, जगा आणि जगू द्या!