शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक साधना- मृत्यूच्या मुळापासून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 18:48 IST

अध्यात्मिक साधना हि मृत्यूबद्दल नसून मृत्यूचे मूळ म्हणजे जन्म यापासून मुक्ती मिळ्वण्याबद्दल आहे हे सद्गुरू सांगत आहेत.

मृत्यू हा बहुतेक लोकांसाठी जीवनाचा सर्वात प्रगल्भ आणि गूढ पैलू आहे कारण लोकांनी कोणत्याही गोष्टी ऐकल्या तरीही त्यांना ते काय आहे हे उमजत नाही. विज्ञान आणि तत्त्वज्ञानही मृत्यू काय आहे हे उलगडू शकले नाहीत.  अध्यात्मिक प्रक्रिया ही मृत्यबद्दल नाही - तुम्ही अश्या गोष्टीच्या शोधात असता ज्या मृत्यूहूनही खोल आहे. मृत्यूही सांसारिक गोष्ट आहे, त्याबद्दल प्रगल्भ किंवा गूढ असे काहीही नाही. ही अशी गोष्ट आहे जी लोकांबरोबर कायम घडत आली आहे. मृत्यू प्रगल्भ आणि गूढ वाटतो कारण “शॉर्ट टर्म मेमरी लॉस” (स्मरणशक्तीची कमजोरी). जर तुमची स्मरणशक्ती अशी असेल की दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला मागील दिवस आठवत नाही, तुम्हाला आठवत नाही की तुम्ही खरोखर झोपी गेला होता, तुम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की तुम्ही जागे झाले आहात, मग दररोज , असे वाटेल की तुम्ही एक जादुई दुनियेत आहात आणि हे सर्वात रहस्यमय असेल. काही तासांची झोप ही तुमच्या जीवनातील सर्वात रहस्यमय आणि सखोल पैलू ठरली असती कारण तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही खरोखर झोपलात आणि मग जागे झालात. मृत्यूचे गूढ आणि प्रगल्भता अशीच आहे.

जेव्हा आपण असं म्हणतो "शिव हा विनाशाक आहे. " आपण असे म्हणत नसतो की तो म्हणजे मृत्यू. त्याला मृत्यू मध्ये काहीही रस नाही. त्याच्यासाठी जन्म घेणे आणि मरण पावणे या फारच सांसारिक गोष्टी आहेत, जीवनाचा फार वरवरचा पैलू. तो त्याच्या अंगावर स्मशानातील राख लावून घेतो याचे एक कारण म्हणजे त्याला दाखवायचे आहे की त्याला मृत्यूचा तिटकारा आहे. तो त्याच्याकडे प्रगल्भ किंवा गूढ म्हणून बघत नाही. अध्यात्मिक साधना ही मृत्यूबद्दल नाही. ही मृत्यूच्या मुळापासून जे की जन्म आहे त्यापासून मुक्त होण्याबद्दल आहे. जन्मापासून मुक्त होणे म्हणजेच नैसर्गिकपणे मृत्यूपासून मुक्त होणे.

जन्म आणि मृत्यू हा केवळ कुंभाराचा व्यवसाय आहे - पृथ्वीचा तुकडा उचलणे, त्याला मानवी स्वरुपात आकार देणे आणि तो चालवणे आणि बोलवणे. काही काळानंतर कठपुतळीत बदलणारा हा कुंभाराचा व्यवसाय हा एक साधा खेळ आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून नाटक जाणून घेणे ही एक गोष्ट असते. स्टेजच्या मागून नाटक जाणून घेणे पूर्णपणे भिन्न आहे. एकदा तुम्ही बॅकस्टेजवरुन नाटक पहायला सुरुवात केली की काही वेळाने तुम्हाला ते नकोसे होते. तुम्ही कदाचित त्यातील यांत्रिकीचा आनंद घ्याल परंतु तुम्हाला त्यातील कथेत काही उत्साह वाटणार नाही. कारण हे सर्व कसे एकत्र केले जाते हे तुम्हाला माहित असते. केवळ ज्यांच्याकडे अल्पकालीन स्मृती आहे - दररोज ते एकाच नाटकात येऊन बसतात परंतु मागील दिवसाची आठवण त्यांनी विसरली आहे - त्यांच्यासाठी ते खूप रोमांचक आणि आव्हानात्मक आहे.

तर अध्यात्मिक प्रक्रिया ही जीवन मरणाबद्दल नाही.शरीर जीवन आणि मृत्यू आहे- अध्यात्मिक प्रक्रिया ही तुमच्याबद्दल आहे, जे की जीवन नाही आणि मृत्यूही नाही.