२४ फेब्रुवारी २०२६ रोजी, मंगळवार असून या दिवशी 'मासिक दुर्गाष्टमी' हा अतिशय शुभ योग जुळून आला आहे. शक्तीची देवता माता दुर्गा आणि संकटमोचक हनुमान यांचा हा दुग्धशर्करा योग भक्तांसाठी विशेष फलदायी ठरणार आहे.
होलाष्टक २०२६: येत्या आठ दिवसात काहीही खरेदी करण्यापूर्वी 'हे' वाचा; सुरु होत आहे होलाष्टक!
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला 'मासिक दुर्गाष्टमी' साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रात मंगळवार हा शौर्य आणि ऊर्जेचा कारक मानला जातो, तर अष्टमी ही देवी दुर्गेच्या शक्तीचे प्रतीक आहे. ही तिथी साजरी कशी करावी ते जाणून घेऊ.
१. मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व
अष्टमी तिथी ही माता दुर्गेला समर्पित आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवी दुर्गेची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो. ज्यांच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत आहेत किंवा जे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटतात, त्यांच्यासाठी ही अष्टमी आत्मबळ वाढवणारी ठरते.
२. मंगळवारचा दुग्धशर्करा योग
मंगळवारी दुर्गाष्टमी आल्यामुळे या दिवशी हनुमान आणि माता दुर्गा या दोघांचीही विशेष कृपा प्राप्त करता येते. मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे आणि दुर्गा ही आदिमाया शक्ती! त्यामुळे हा दिवस विशेषतः कर्जमुक्ती, जमिनीचे व्यवहार आणि कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
३. या तिथीला करायचे विशेष उपाय (Remedies):
देवीला लाल फुले अर्पण करा: सकाळी स्नान केल्यानंतर माता दुर्गेला लाल जास्वंद किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात.
दुर्गा चालीसा आणि हनुमान चालीसा: उद्याच्या दिवशी या दोन्ही स्तोत्रांचे पठण करणे तुम्हाला दुहेरी संरक्षण देते.
नंदादीप लावा: घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून 'ओम दुं दुर्गायै नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
दानधर्म: उद्या शक्य असल्यास गरजू व्यक्तींना लाल रंगाचे धान्य (उदा. मसूर डाळ) किंवा गुळाचे दान करावे.
होलाष्टकाचा प्रारंभ आणि दुर्गाष्टमी
विशेष गोष्ट म्हणजे याच तिथीला 'होलाष्टक' देखील सुरू होत आहे. होलाष्टकात शुभ कार्ये वर्ज्य असली तरी, मंत्रसाधना आणि देवपूजा करण्यासाठी हा काळ अतिशय श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे उद्या केलेली देवीची उपासना तुमच्यासाठी येणाऱ्या काळात संरक्षक कवच म्हणून काम करेल.
Web Summary : February 24, 2026, brings a rare Tuesday-Durga Ashtami combination. Worship Durga and Hanuman for strength and overcoming obstacles. Perform specific remedies like offering red flowers, chanting Chalisa, lighting a lamp, and donating red lentils for prosperity and protection during Holashtak.
Web Summary : 24 फरवरी, 2026 को दुर्लभ मंगलवार-दुर्गा अष्टमी का संयोग है। शक्ति और बाधाओं को दूर करने के लिए दुर्गा और हनुमान की पूजा करें। समृद्धि और सुरक्षा के लिए लाल फूल अर्पित करें, चालीसा का जाप करें, दीपक जलाएं और लाल मसूर की दाल दान करें।