शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Solar Eclipse 2022: २७ वर्षांनी सूर्यग्रहणाला अद्भूत संयोग! तूळ राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग; कसा असेल ग्रहण प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 17:11 IST

Solar Eclipse 2022: २७ वर्षांपूर्वीही दिवाळीत सूर्यग्रहण लागले होते. ग्रहांची स्थितीही अगदी यंदासारखीच होती, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

Solar Eclipse 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहण लागणार आहे. सन २०२२ मधील दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे. भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण असणार असून, ऐन दिवाळीत हे खंडग्रास पद्धतीने सूर्यग्रहण दिसेल. २५ ऑक्टोबर रोजी हे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार असून, ग्रहणाचा कालावधी ४ तास ३ मिनिटे असणार आहे. या सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात आहे. तूळ राशीतील ग्रहांचा अद्भूत संयोग आणि ग्रहणाचा देश-दुनियेवरील प्रभाव याबाबत जाणून घेऊया... (Solar Eclipse 2022)

दिवाळीत सूर्यग्रहण लागण्याचा योग २७ वर्षांपूर्वी जुळून आला होता. सन १९९५ मध्ये २३ ऑक्टोबरला दिवाळीचा सण होता आणि २४ ऑक्टोबरला सूर्यग्रहण होते. यंदा दिवाळी २४ ऑक्टोबरला आणि ग्रहण २५ ऑक्टोबरला आहे. सन १९९५ मध्येही तूळ राशीत सूर्यग्रहण झाले होते आणि या वर्षीही तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. (surya grahan in diwali 2022)

तूळ राशीत ४ ग्रहांचा दुर्मिळ योगायोग

सन १९९५ मध्ये जेव्हा सूर्यग्रहण झाले होते. तेव्हा तूळ राशीत चार ग्रह एकत्र होते. यावेळी राहू, सूर्य, शुक्र आणि चंद्र तूळ राशीत होते. यंदाच्या २५ ऑक्टोबरला होणाऱ्या सूर्यग्रहणात राहू, सूर्य, शुक्र आणि चंद्र तूळ राशीत विराजमान असतील. याशिवाय २७ वर्षांपूर्वी शनी स्वराशीत होता. यंदाही शनी आपले स्वामित्व असलेल्या मकर राशीत आहे. याशिवाय १९९५ मध्ये बुध कन्या राशीत होता आणि यावेळीही बुध कन्या राशीत विराजमान आहे.  यंदाचे सूर्यग्रहण कर्क, सिंह आणि धनु राशींना अतिशय शुभ ठरणार आहे. तर वृषभ, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर राशीच्या व्यक्तींना काहीसे समस्याकारक ठरू शकेल. याशिवाय कुंभ आणि मीन राशींना हे ग्रहण संमिश्र ठरू शकेल. 

सूर्यग्रहणाचा देश-दुनियेवर प्रभाव कसा असेल? 

सूर्यग्रहणाचा उज्जैन आणि आजूबाजूच्या परिसरात अधिक प्रभाव दिसू शकेल. राजस्थान, कच्छ आणि गुजरातमधील व्यापारी वर्गातील लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सूर्यग्रहणानंतर सरकारी यंत्रणांची कारवाई व्यापारी वर्गातील लोकांना त्रस्त करू शकते. गहू, मोहरी आदी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येऊ शकते. याशिवाय सूर्यग्रहणाचा प्रभाव युरोप, मध्य पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उत्तर महासागरात सर्वाधिक दिसून येईल. हे सूर्यग्रहण युरोपियन देशांसाठी चांगले होणार नाही, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिषDiwaliदिवाळी 2022