शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

प्रकट दिन: आठवणीने आवर्जून म्हणा ‘हे’ प्रभावी स्तोत्र; स्वामी कायम असतील प्रसन्न, शुभ घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:39 IST

Shree Swami Samarth Prakat Din 2025: स्वामींच्या प्रकट दिनी हे प्रभावी स्तोत्र म्हणणे शुभ मानले गेले असून, जेव्हा-जेव्हा शक्य होईल, तेव्हा-तेव्हा हे स्तोत्र आवर्जून म्हणावे. शक्य तितकी या स्तोत्राची पारायणे करावीत, असे सांगितले जाते.

Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. हिंदू नववर्ष गुढीपाडवा झाला की, दुसऱ्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन असतो. विशेष म्हणजे एकाच चैत्र महिन्यात स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि अवतार समाप्ती असते. त्यामुळे चैत्र महिना स्वामींची कृपा लाभावी, स्वामींची कृपा वर्षभर कायम असावी, यासाठी स्वामी सेवा करण्याचा काळ मानला जातो. वास्तविक नित्य नियमाने, न चुकता, अगदी मनाचा संकल्प करून स्वामींची सेवा करतच राहायला हवी. स्वामी आपल्याला काय फळ देतील, याची अपेक्षा न करता स्वामी सेवेत लीन असावे, असे सांगितले जाते. असे करताना स्वामींच्या चरणी अगदी समर्पण भाव, स्वामींवर दृढ अढळ विश्वास असावा, असे सांगितले जाते. 

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी स्वामींचे केलेले नामस्मरण, स्तोत्र पठण, मंत्रांचे जप विशेष करून शुभ पुण्यदायी ठरते, अशी मान्यता आहे. कोट्यवधी स्वामी भक्त आवर्जून या दिवशी अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. स्वामी समर्थ महाराजांना समर्पित अनेक स्तोत्रे, आरत्या, मंत्र, श्लोक आहेत. पैकी गुरुस्तवन स्तोत्र हे अत्यंत प्रभावी, पुण्यदायी आणि दिव्य अनुभूती देणारे मानले जाते. परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींच्या प्रेरणेने दिव्य श्रीगुरुस्तवन स्तोत्र रचले. या स्तोत्रांच्या दिव्य अनुभूती भक्तांना आल्या आहेत, असे सांगितले जाते. 

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र 

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ।। १ ।। 

तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण । तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ।। २ ।। 

तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरिहर ब्रह्मया । परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ।। ३ ।। 

मूळ मूळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू । सच्चित शक्तीचा आधारू । पुर्णाधारू ॐकारासी ।। ४ ।। 

ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव । इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ।। ५ ।। 

ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू । चराचरीचा आकारू । पुर्णाधारू म्हणविले ।। ६ ।। 

ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती । तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवूनी ।। ७ ।। 

तरी देवा मतिदान । देणे तुझचि कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ।। ८ ।। 

अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा । सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ।। ९ ।। 

रूप पहाता मनोहर । मूर्ति केवळ दिगंबर । कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ।। १० ।। 

कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ति । भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त भाविकांचे ।। ११ ।। 

भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु । ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ।। १२ ।। 

सरळ दंड जानु प्रमाण । आजानबाहु कर जाण । जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ।। १३ ।। 

ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरू । मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ।। १४ ।। 

ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ।। १५ ।। 

तेथे मी लडिवाळ । खरे जाणिजे तुझे बाळ । म्हणवोनी पुरवि माझी आळ । माय कणवाळ म्हणविसी ।। १६ ।। 

मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी । ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ।। १७ ।। 

मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे । तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ।। १८ ।।

कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक । ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ।। १९ ।।

माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले । हे क्षमा करोनि वहिले । मज तारी गुरुराया ।। २० ।। 

पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म । अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ।। २१ ।। 

हे क्षमा करोनि दातारा । मज तारावे लेकरा । तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ।। २२ ।। 

मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म । नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे ।। २३ ।। 

नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही । ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ।। २४ ।।

मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले । मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ।। २५ ।।

तू विश्वाकारु विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू । तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ।। २६ ।। 

चार देहाच्या सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी । हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ।। २७ ।। 

जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ।। २८ ।। 

ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेद्गुरू । परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ।। २९ ।। 

भावभक्ती चोखट । करणे नेणे बिकट । नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ।। ३० ।। 

हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी ।   तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ।। ३१ ।।

म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ।। ३२ ।। 

म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ।। ३३ ।। 

अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ।। ३४ ।। 

यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ।। ३५ ।। 

म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण । जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ।। ३६ ।। 

शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता । पुरवि तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ।। ३७ ।। 

हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण । भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ।। ३८ ।।

जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण । देवोनि भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ।। ३९ ।। 

हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा । फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ।। ४० ।। 

हे जगा हितकारी । चुकवि चुकवि भ्रमफेरी । मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ।। ४१ ।। 

हे आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी । स्मरता झुलवी निरंजनी । योगी ध्यानी डुलविले ।। ४२ ।। 

ऐसे ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित गुरुकारण । केवळ तो हरि हर ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूर्ण । गुरुहृदय भुवन व्यापिले ।। ४३ ।। 

तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती । नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ।। ४४ ।। 

अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार । होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ।। ४५ ।। 

तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण । धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ।। ४६ ।। 

ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर । सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ।। ४७ ।।

शालिवाहन शके तिनशे चाळीस । शुद्धपक्ष पूर्ण चैत्र मास । अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ।। ४८ ।। 

तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार । सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ।। ४९ ।। 

ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ । गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ।। ५० ।। 

।। श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ।।

।। श्री स्वामी समर्थ ।।

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकakkalkot-acअक्कलकोट