शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन: पूजन झाल्यावर आवर्जून म्हणा आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:52 IST

Shree Swami Samarth Prakat Din 2025: स्वामींचे पूजन झाल्यावर स्वामींच्या विविध आरत्या, प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते. 

Shree Swami Samarth Prakat Din 2025: चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरुपात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा अधिक कल असतो. स्वामींचे पूजन झाल्यावर स्वामींच्या विविध आरत्या, प्रदक्षिणा आणि मंत्र पुष्पांजली आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते. 

श्री स्वामी समर्थ आरती हे एक साधन नसून, त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आराध्याला आदराने स्मरण करण्याची व प्रेमाची प्रतिमा आहे. आरतीचे महत्त्व प्राचीन आहे. आरतीने भक्तांना त्यांच्या आराध्याच्या सानिध्यात आणि दिव्यत्वात आत्मीय अनुभव करण्याची संधी देते. अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या आरतीने भक्तांना आत्मिक शांतता, संतोष आणि ध्यान प्रदान करते, असे मानले जाते. 

श्री स्वामी समर्थ महाराज आरती - १

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थाआरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!

छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!

त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामरशेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!

देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पायातुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!

अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!

स्वामी समर्थ महाराजांची आरती - २

जय देव जय देव, जय जय अवधूता, हो स्वामी अवधूता।अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव॥धृ॥

तुमचे दर्शन होता जाती ही पापे।स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते।चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते।वैकुंठीचे सुख नाही या परते।।जय देव जय देव॥१॥

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा।कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा।शरणागत तुज होतां भय पडले काळा।तुमचे दास करिती सेवा सोहळा।। जय देव जय देव॥२॥

मानवरुपी काया दिससी आम्हांस।अक्कलकोटी केले यतिवेषे वास।पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास।अज्ञानी जीवास विपरीत भास।। जय देव जय देव॥३॥

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक।स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक।अनंत रुपे धरसी करणे नाएक।तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख।।जय देव जय देव॥४॥

घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी।त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी।सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी।शरणागत दासावर करी कृपा दृष्टी।।जय देव जय देव॥५॥

श्री स्वामी समर्थ आरती - ३

जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,आरती करु गुरुवर्या रे।अगाध महिमा तव चरणांचा,वर्णाया मति दे यारे ॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया,दाविली अघटित चर्या रे।लीलापाशे बध्द करुनिया,तोडिले भवभया रे ॥१॥ यवन पूछिले स्वामी कहॉ है,अक्कलकोटी पहा रे।समाधी सुख ते भोगुन बोले,धन्य स्वामीवर्या रे ॥२॥ जाणिसे मनीचे सर्व समर्था,विनवू किती भव हरा रे।इतुके देई दीनदयाळा,नच तव पद अंतरा रे ॥३॥

श्री स्वामी समर्थ महाराज आरती - ४

आरती स्वामी राजा।कोटी आदित्यतेजा। तु गुरु मायबाप।प्रभू अजानुभुजा। आरती स्वामी राजा॥धृ॥ पुर्ण ब्रम्ह नारायण।देव स्वामी समर्थ। कलीयुगी अक्कलकोटी।आले वैकुंठ नायक। आरती स्वामी राजा ॥ लीलया उद्धरिले।भोळे भाबडे जन। बहुतीव्र साधकासी।केले आपुल्या समान। आरती स्वामी राजा ॥ अखंड प्रेम राहो। नामी ध्यानी दयाळा। सत्यदेव सरस्वती। म्हणे आम्हा सांभाळा। आरती स्वामी राजा॥३॥

स्वामी समर्थ महाराज आरती प्रदक्षिणा

धन्य तारक प्रदक्षणा या श्रीगुरुरायाची ।। आवड झाली भक्तजनाला भव उतरायाची ।। धृ।। 

प्रदक्षणा करितां दुरित भार हा जाळी ।। एक एक पाऊली कोटी तीर्थे आंघोळी ।।१।। 

कोटीकोटी अश्वमेध एक पाउली ।। स्वामिनाम मुखी गाता गाता पुण्याची ही बोली ।। २ ।। 

कोटी कन्यादान शतकोटी या कपिला ।। मेरुतुल्य कांचन देतां भार नसे पाउला ।।३।। 

दगड पाषाण तरुवर तरती जाणा ज्या नामे ।। पदोपदी हे पुण्यची भारी तुटली भवभ्रमे ।।४।। 

भूत पिशाच्च समंध जाती प्रदक्षणा केल्या ।। बहात्तर रोग कर जोडीती तीर्थे सेवील्या ।।५।। 

देवादिक हे कर जोडीती जाणा तद्भक्ता ।। प्रदक्षणा ही करितां भावे नाही कधी चिंता ।। ६ ।। 

पूर्वज तरती नाकी जाती होती सुखरूप ।। स्वामिनाम प्रदक्षणे कार्य साधे नको जपतप ।।७।। 

म्हणुनी जना हे सांगतसे मी निज सुख जाणा ।। स्वामी आनंदनाथ हा करुणा वचने बोधितसे मना ।।८।।

श्री स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली

पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा।ओंकाराकारा परात्परा गुरो आम्हा तुझा आसरा।।मूलाधार जगतप्रभू तुझी लीला न जाणे कुणी।देवा विघ्न हरी आम्हावरि करी, आडो न माया गुणी॥१॥

आनंदकंद विमला ज्ञानस्वरुपा।साक्षी सदैव हृदयस्थ ही मायबापा।।स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्व तापा।दावि स्वरूप मज लावूनी ज्ञानदीपा॥२॥

धर्मग्लानि कराल काल कली हा शास्ता नुरे या मही।तत्वाचा लव मागमूस न दिसे धुंडूनि सत्वातहि।।भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजयदत्त हा।होई लीन अनन्यभावे चरणी वंदी सदा दास हा॥३॥

विधीहरिहर हे एकरूपे मिळाले।परमगुरुस्वरूपे देखता नेत्र घाले।।अनुपम तव प्रीती लीन होताती भक्तं।तव पद झणि देशी धन्य तू एक दत्त॥४॥

परमात्मा पुरूषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा।लीलाविग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा।।ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा।अर्पितसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगतगुरुवरा॥५॥

ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा।ओंकारस्वरूपा तू वेद जननी दुरवी न आम्हा कदा।।भावे ज्या भजता भिउनि पळती दैन्यादि सर्वापदा।गायत्री सुमने नमू करी कृपा आम्हावरी सर्वदा॥६॥

- याशिवाय तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या माहिती असलेल्या आरत्या आवर्जून म्हणाव्यात. श्लोक, स्तोत्रांचे पठण वा श्रवण आवर्जून करावे.

।। श्री स्वामी समर्थ ।।

 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थakkalkot-acअक्कलकोटAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधी