शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:33 IST

Shravani Somvar 2025 Shivamuth Importance In Marathi: यंदा श्रावणात किती सोमवार आहेत? कोणती शिवामूठ वाहायची आहे? शिवामूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत, शास्त्र, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या...

Shravani Somvar 2025 Shivamuth Importance In Marathi: चातुर्मासातील श्रावण महिना सुरू होत आहे. मराठी वर्षातील श्रावण महिना अनेकार्थाने विशेष मानला जातो. यंदाचा श्रावण महिना सुरू होताना गुरुपुष्यामृतयोग जुळून येत आहे. श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत शुभ योगात होणे पुण्यफलदायी मानले गेले आहे. उत्तर भारतीय पंचांगानुसार, श्रावण महिना सुरू झालेला आहे. परंतु, महाराष्ट्रासह लगतच्या भागांमध्ये शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी श्रावण मास सुरू होत आहे. श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी अर्पण करावी? शिवामूठ वाहण्याचे महत्त्व, महात्म्य जाणून घेऊया...

श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. श्रावण महिन्याला व्रत-वैकल्यांचा राजा म्हटले जाते. या दिवशी दररोज व्रते आचरली जातात. श्रावणीतील व्रते जेवढी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टीकोनातून महत्त्वाची आहे, तेवढीच निसर्ग आणि शास्त्राधारही असणारी आहेत, असे मानले जाते. यंदाच्या २०२५ वर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवारी होत आहे. पहिला श्रावणी सोमवार, २८ जुले २०२५ रोजी आहे.

श्रावणी सोमवारचे महत्त्व

आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्रीविष्णू योगनिर्देत जातात. त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भूत परंपरा मानली गेली आहे.

श्रावणी सोमवारी शिवमुठीचे व्रत

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू (पाचवा श्रावणी सोमवार) यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असतो. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी, असे म्हटले जाते.

श्रावणातील मोठा वसा शिवामूठ

प्रत्येक मुलीला वाटते की, आपण जेव्हा सासरी जातो, तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते.

शिवामूठ अन् दानाचे महात्म्य

आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत-वैकल्ये महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो, ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी, असे सांगितले जाते. 

यंदा श्रावणी सोमवार किती आणि कधी?

- पहिला श्रावणी सोमवार: २८ जुलै २०२५ - शिवामूठ: तांदूळ

- दुसरा श्रावणी सोमवार: ०४ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: तीळ

- तिसरा श्रावणी सोमवार: ११ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: मूग

- चौथा श्रावणी सोमवार: १८ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: जव

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiपूजा विधीchaturmasचातुर्मासReligious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक