शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त करा महादेवाचे आवडते 'चुरमा लाडू', वाचा सविस्तर रेसेपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:12 IST

Shravan Somwar 2023: श्रावणात महादेवाला प्रिय अशा चुरमा लाडूचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, ते घरच्या घरी कसे बनवायचे ते जाणून घ्या!

आज या वर्षातला शेवटचा श्रावणी सोमवार. त्यानिमित्त वैदेही भावे यांच्या चकली ब्लॉग स्पॉटवरील चुरमा लाडूची सहज सोपी रेसेपी शेअर करत आहे. सायंकाळी उपास सोडताना हे लाडू नैवेद्याच्या ताटात वाढा आणि घरच्यांची वाहवा मिळवा. वाचा रेसेपी आणि फॉलो करा टिप्स. 

चुरमा लाडू

साहित्य:३/४ कप बेसन१/२ कप साखर१/४ कप पाणी१/४ किलो तूप१/२ टीस्पून वेलचीपूड१ टेस्पून बेदाणे

कृती:१) बेसन एका वाडग्यात घालावे. २ टीस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन बेसनात घालावे. मिक्स करून ३-४ टेस्पून पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.२) १५ मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे. (पुरी लाटता येईल इतपतच मऊ करावे)३) कढईत तूप गरम करावे. मळलेल्या बेसनाच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. या पुऱ्या गरम तुपात तळून घ्याव्यात. आच मध्यम आणि मंद यांच्यामध्ये ठेवावी.४) पुऱ्या तळल्यावर खुसखुशीत झाल्या पाहिजेत. पुऱ्या कोमट झाल्या कि हाताने चुरून घ्याव्यात. चाळणीवर चाळून चाळणीत उरलेला जाडसर भाग लाटण्याने लाटून बारीक करावे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावे. (शॉर्टकट - मी पुऱ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड केली)५) साखर आणि पाणी एकत्र करून दोन तारी पाक करावा. साखर विरघळून उकळी फुटली कि ३-४ मिनिटांनी पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकावा. दोन चिमटीत घेउन उघडझाप करावी. दोन तारा दिसल्या तर पाक तयार झाला असे समजावे नहितर अजून थोडावेळ उकळावे. फक्त मध्येमध्ये तार चेक करत राहावी. गरम दोनतारी पाक कुटलेल्या बेसनात घालावा. वेलचीपूड आणि बेदाणे घालावे. मिक्स करून मिश्रण आळू द्यावे.६) मिश्रण आळले कि लाडू वळावेत.

टीपा:१) लाडूचे मिश्रण आळायला लागणारा वेळ बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. पाक जर दोन तारीपेक्षा थोडा जास्त झाला तर लाडूचे मिश्रण लवकर आळेल. पाक जर दोनतारी पेक्षा कमी आटला असेल वेळ जास्त लागेल. तसेच थंड प्रदेशात मिश्रण पटकन आळते. आणि याउलट उष्ण भागात आळायला वेळ जास्त लागतो.२) पुऱ्या खूप डार्क रंग येईपर्यंत तळू नयेत. गडद रंग आल्यास लाडूसुद्धा काळपट रंगाचे होतील.३) या लाडवांची चव थोडी बुंदी लाडूसारखी लागते.४) वरील पाककृतीत बेसनाऐवजी गव्हाचे पीठ आणि थोडा रवा वापरूनसुद्धा चुरमा लाडू बनवता येतात. गव्हाची कणिक (७०%)  आणि रवा (३०%).५) ६ कप बेसन आणि ४ कप साखर वापरून केलेला पाक यापासून साधारण ४५ ते ५० लाडू होतील.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलFood recipes 2023पाककृती 2023