शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

दुसरा श्रावण शुक्रवार: दुर्गाष्टमी-दूर्वाष्टमी एकाच दिवशी, ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:30 IST

Shravan Shukrawar Durgashtami Durvashtami Vrat 2025: श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी अनेक व्रतांचा शुभ संयोग जुळून आला आहे. शुक्रवारी केलेले देवीचे पूजन अतिशय पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या...

Shravan Shukrawar Durgashtami Durvashtami Vrat 2025: मराठी वर्षाच्या चातुर्मासात अनन्य साधारण असलेला श्रावण महिना सुरू आहे. शुक्रवारीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. आता ०१ ऑगस्ट २०२५ रोजी दुसरा श्रावणी शुक्रवार आहे. दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी अनेक व्रतांचा महासंगम झाल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या श्रावण शुक्रवारी जरा-जिवंतिका व्रत, दुर्गाष्टमी, दूर्वाष्टमी व्रत आहे. शुक्रवार हा देवी पूजनासाठी अतिशय शुभ आणि विशेष मानला जातो. त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी देवीशी संबंधित व्रते आल्याने या दिवशी केलेल्या पूजनाने पुण्य फल प्राप्ती होऊ शकते, असे म्हटले जात आहे. 

श्रावणातील अष्टमीला दूर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे. दूर्वांचे महत्त्व आणि महात्म्य अधोरेखित करणारे हे व्रत असल्याचे म्हटले जाते. श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असते. चतुर्थीपासून पुढे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश पूजनात दूर्वांना अनन्य साधारण महत्त्व असते. त्यामुळेच दूर्वा वृद्धी व्हावी, दूर्वांची जोपासना व्हावी, या उद्देशाने हे दूर्वाष्टमीचे व्रताचरण केले जात असावे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व

श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर ऋतुकालोद्भव फुले, फळे वाहावीत. धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. आरती करावी. पूजेच्या शेवटी 'त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तुतासि महीतले । तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ।।' हा श्लोक म्हणावा. 

दूर्वांची प्रार्थना करावी

दूर्वांसह शिव, पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दूर्वांची प्रार्थना करावी. मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास सहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो, अशा अर्थाची साध्या, सोप्या भाषेत प्रार्थना करावी. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी. कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्यासंदर्भातल कथा श्रवण करणे, वाचणे लाभदायक मानले गेले आहे.

अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला

समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दूर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दूर्वांवर सांडले. त्यामुळे अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला, अशी कथा पुराणांमध्ये आढळते. त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दूर्वांची पूजा केली जाते. संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ मिळण्यासाठी हे व्रत करावे, असे सांगितले जाते. दूर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दूर्वाच घ्याव्यात, असे आग्रहाने सांगितले जाते.

उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे

अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ, पवित्र अशा जमिनीवर दूर्वा उगवलेल्या असतील, त्या ठिकाणी जाऊन दूर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दूर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी. शिवपूजेत दूर्वा-रशमी तसेच अन्य फुले असणे आवश्यक आहे. शेवटी खोबरे, खजूर यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षता घातलेल्या दह्याचे अर्घ्य द्यावे. स्वत: व्रतकर्त्या महिलांनी त्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा. उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे. तीळ आणि कणीक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते. असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व कुटुंबातील सदस्य, आप्तेष्टमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना द्यावे, असे सांगितले जाते. अनेक भागात दूर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते.

दुर्गाष्टमीला करा विशेष पूजन

मराठी महिन्याच्या प्रत्येत शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते. हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते. या दिवशी देवीची विशेष पूजा, उपासना, नामस्मरण केल्यास शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते. या दिवशी षोडषोपचार पद्धतीने देवीचे पूजन करावे. षोडषोपचार पद्धतीने शक्य नसेल तर पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. देवीला सौभाग्यलंकार अर्पण करावेत. देवीच्या आवडत्या वस्तू, गोड पदार्थ, फुले-फळे अर्पण करावीत. मनोभावे पूजन करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. आपापले कुलाचार, कुळधर्म यांप्रमाणे करावे. तिन्हीसांजेला आवर्जून देवीचे नामस्मरण, मंत्रांचे जप करावेत. शक्य असेल, तर श्रीसुक्त म्हणावे. तसेच देवीशी संबंधित स्तोत्रे म्हणावीत.

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiपूजा विधीLaxmi Pujanलक्ष्मीपूजनchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक